Lakhimpur violence: व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपद्वारे रचला लखीमपूर हिंसेचा प्लॅन? चॅटमध्ये आढळल्या ‘या’ गोष्टी

खीमपूर हिंसाचाराआधी 'ललकार किसान' नावाने एक व्हॉट्स अ‍ॅपप ग्रुप तयार करण्यात आला

Lakhimpur violence conspiracy plan hatched by WhatsApp group called Lalkar Kisan
Lakhimpur violence: व्हॉट्स अॅप ग्रुपद्वारे रचला लखीमपूर हिंसेचा प्लॅन? चॅटमध्ये आढळल्या 'या' गोष्टी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी (Lakhimpur khiri violence) येथे रविवारी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेले ४ शेतकरी होते. ३ लोक भाजपचे कार्येकर्ते होते तर १ भाजपचे नेत्याचा ड्राइव्हर आणि एका पत्रकाराचा समावेश होता. लखीमपूर हिंसा प्रकरणात आता मोठा खुलासा समोर येत आहे. हा हिंसाचार घडवून आणण्यासाठी व्हॉट्स ग्रुपद्वारे प्लॅन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लखीमपूर हिंसाचाराआधी ‘ललकार किसान’ नावाने एक व्हॉट्स अ‍ॅपप ग्रुप तयार करण्यात आला होता. ज्यात केंद्रीय गृह मंत्री राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा व्हिडिओ शेअर करत याचा बदला घ्यायचा आहे असे लिहून व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ललकार किसान’ हा व्हॉट्स ग्रुप खलिस्तान टास्क फोर्सच्या एका पूर्व सदस्याने बनवला होता.  पोलीस  लखीमपूर हिंसाचाराआधी मेसेज फॉरवर्ड करणाऱ्या या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनचा शोध घेत आहेत.

लखीमपूर हिंसाचाराची कट कोणी केला? मृत्यू झालेल्या लोकांची जबाबदारी कोणाची? लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांमध्ये अराजकता होती का?अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी आहेत. उत्तर प्रदेश सरकारने हायकोर्टाच्या रिटायर्ड न्यायाधिशांशी या प्रकरणी तपास करण्याची मागणी केली आहे. या हिंसाचारात राजकारणाचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. हायकोर्टाच्या रिटायर्ड न्यायाधिश या प्रकरणी कारवाई करतील. या हिंसेच मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे तर जखमींच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत केली जाणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे.


हेही वाचा – Lakhimpur Kheri Violence: महाराष्ट्रात घडलं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तांडव केला असता – राऊत