राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला, पंतप्रधान नेहरूंनंतर असं करणारे दुसरे काँग्रेस नेते

या ठिकाणी राहुल गांधींनी ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला आहे. तिरंगा फडकवताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

Rahul-Gandhi-Lal-Chowk-Tiranga
लाल चौकात तिंरगा फडकवणारे राहूल गांधी हे दुसरे कॉंग्रेसी नेता ठरले आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला. यावेळी त्यांच्यासोबत बहीण प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. यादरम्यान मोठा सुरक्षा दल तैनात करण्यात आला होता. संपूर्ण परिसर बॅरिकेड्स लावून सील करण्यात आला होता. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि १४ राज्यांमधून ३९७० किलोमीटरचे अंतर कापून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पोहोचली. या ठिकाणी राहुल गांधींनी ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला आहे. तिरंगा फडकवताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

तिरंगा फडकवण्यासाठी घंटाघरला जाण्यापूर्वी सोनावरच्या प्रवासातून राहुल यांनी ३० मिनिटांचा ब्रेक घेतला आणि मौलाना आझाद रोड येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात पोहोचले. शनिवारी रात्रीपासूनच लाल चौकाकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले होते. तसंच वाहनांच्या वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले होते.

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आले नव्हते, तेव्हा काश्मीरमधील लाल चौकात जाऊन देशाच्या कुठल्यातरी भागातून तिरंगा फडकवल्याबद्दलच्या बातम्या पहायला मिळत होत्या. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यापासून लाल चौकात तिरंगा फडकवला जाऊ लागला, पण त्यापूर्वीच्या काळात असं धाडस करणं हे एखाद्या संकटाला आमंत्रण देण्यासारखंच होतं. लाल चौकात तिंरगा फडकवणारे राहूल गांधी हे दुसरे कॉंग्रेसी नेता ठरले आहेत.

पंडित नेहरूंनी १९४८ मध्ये लाल चौकातून तिरंगा फडकवला

१९४८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही इथे ध्वजारोहण केले होते. भारताला पाकिस्तानवर विजयाची संधी होती. त्यावेळी जवाहरलाल नेहरूंसोबत शेख अब्दुल्ला यांनी लाल चौकात झेंडा फडकावला होता. १९४८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांनी लाल चौकात एकत्र उभे राहून पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात विजयाची घोषणा केली. तिरंगा फडकवल्यानंतर शेख अब्दुल्ला यांनी अमीर खुसरो यांची कविताही वाचली.