Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशAdvani on Bharat Ratna : भारतरत्न जाहीर झाल्यावर लालकृष्ण आडवाणींनी दिली 'ही'...

Advani on Bharat Ratna : भारतरत्न जाहीर झाल्यावर लालकृष्ण आडवाणींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Subscribe

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार, 3 फेब्रुवारी रोजी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली. यावर स्वतः आडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहेच, पण आयुष्यभर मी ज्या आदर्श आणि तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न केला त्याचाही हा सन्मान असल्याचे ते म्हणाले.

आपल्या निवेदनात आडवाणी म्हणतात, “अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने मी हा ‘भारतरत्न’ स्वीकारतो. केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठीच नाही, तर ज्या आदर्श आणि तत्त्वांच्या आधारे मी जगतो आहे, त्यांचाही हा सन्मान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून मला जी जबाबदारी सोपवण्यात आली, ती मी नि:स्वार्थपणे पार पाडल्याचे आडवाणी सांगतात.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar on Poonam Pandey : पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा, पण अजित पवारांनी केलं दुःख व्यक्त

पंतप्रधान मोदी यांनी हळूहळू पक्षातील जुन्या – जाणत्या नेत्यांना बाजूला केल्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. त्यातच अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी गैरहजर राहिले. वास्तविक, राम मंदिर आंदोलनात आडवाणी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यामुळेच या लोकार्पण सोहोळ्याला जाणार नसल्याचे आडवाणी यांनी सांगितल्यानंतर या दोघांमध्ये सगळे आलबेल नाही, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, आडवाणी यांनी आपण तब्येतीच्या कारणास्तव जाणार नसल्याचे जाहीर करत या वादावर पडदा टाकला. तसेच या राम मंदिरासाठी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली असेल, असेही आडवाणी यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर करून या दोन्ही नेत्यांनी आपल्यात कसलेही वाद नाहीत, हे दाखवून दिले आहे. शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत आडवाणी यांचे अभिनंदन केले. “लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना या सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन केले.” भारताच्या विकासात लालकृष्ण आडवाणींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही मोदी म्हणाले. देशातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक म्हणून त्यांचे वर्णन केले. भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. पंतप्रधान म्हणाले, “तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे.”

हेही वाचा – Bharatratna: उशीर केला पण, भारतरत्न घोषित झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य; शरद पवारांची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -