घरदेश-विदेश'फरार' म्हटल्यामुळे चिडलेल्या ललित मोदींनी मुकूल रोहतगींना दिला थेट इशारा

‘फरार’ म्हटल्यामुळे चिडलेल्या ललित मोदींनी मुकूल रोहतगींना दिला थेट इशारा

Subscribe

कोणत्या न्यायालयाने मला फरारी म्हटले असते तर मी काही बोललो नसतो. त्यामुळे पुन्हा तुम्ही मला फरारी बोललात तर विनम्रपणे सांगणार नाही, असा इशारा मोदी यांनी रोहतगी यांना दिला आहे 

नवी दिल्लीः यापुढे मला फरारी म्हणू नका. तुम्हाला लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो, असा इशारा ललित मोदी यांनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना दिला आहे.

ललित मोदी यांनी इंस्टाग्रामवर रोहतगी यांचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मोदी यांनी रोहतगी यांना धमकी वजा विनंती केली आहे. ते म्हणाले, आदरणीय रोहतगीजी, मला फरार म्हणू नका. माझा उल्लेख मिस्टर मोदी असाच कराल. मी तुमचा नेहमीच आदर केला आहे. कधी तुमचा वापर केला नाही. मात्र तुमच्याकडे फक्त तिरस्कारच आहे. कोणत्या न्यायालयाने मला फरारी म्हटले असते तर मी काही बोललो नसतो. त्यामुळे पुन्हा तुम्ही मला फरार बोललात तर विनम्रपणे सांगणार नाही, असा इशारा मोदी यांनी रोहतगी यांना दिला आहे

- Advertisement -

जगात कोणीही कितीही मोठा असला तरी तो पायीच चालतो. जीवन खूप छोटे आहे. सर्व ठिकाणी धोका आहे. काही दिवसांपूर्वी बसने मला धडक दिली होती. थोडक्यात वाचलो. मी देवाचा लाडका मुलगा आहे. देव माझे रक्षण करतो. तुम्ही माझे प्रतिनिधित्व करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यापेक्षा अधिक चांगले असे वकील हरिश साळवे माझ्याकडे आहेत, असा टोलाही मोदी यांनी रोहतगी यांना लगावला आहे.

न्यायाधीशांना विकत घेऊन अश्लीलाला न्याय देत असाल पण मी तुम्हाला लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो. तुमचे नशिब मला मुंग्या आवडत नाहीत. पण तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखेच आहात. मी तुम्हाला चिरडणार नाही. मात्र यापुढे तुम्ही माध्यमांमध्ये माझ्या विषयी काही बोललात तर तुमच्या मागे न्यायालयात येईन, जय हिंद, असा इशारा मोदी यांनी रोहतगी यांना दिला आहे.

- Advertisement -

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मोदी यांच्यावर बीसीसीआयने बंदी घातली आहे. त्यानंतर ते देश सोडून पळून गेले. मध्यंतरी मोदी यांनी त्यांचा व अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा फोटो सोशल मिडियावर टाकला होता. त्याचे उत्तरही सुष्मिता सेनने दिले होते. त्यावरून वाद झाला होता. आता मोदी यांनी रोहतगी यांना सोशल मिडियावर दिलेली समज चर्चेचा विषय बनली आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -