पप्पू म्हणत ललित मोदीचे ट्वीट; राहुल गांधींविरोधात ब्रिटनमध्ये करणार तक्रार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यचा वर्तवली जात आहे. कारण ललित मोदी यांनी ट्विट करून राहुल गांधींविरोधात ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यचा वर्तवली जात आहे. कारण ललित मोदी यांनी ट्वीट करून राहुल गांधींविरोधात ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून ललीत मोदी यांनी माहिती दिली आहे. (Lalit Modi Rahul Gandhi The case will be file in Britain against fugitive statement)

”राहुल गांधी मला फरार म्हणत आहेत. परंतू त्यांच्याकडे याबाबत काय पुरावे आहेत. कोणत्या आधारे मला फरार म्हणत आहेत. मला कुठे दोषी ठरविले गेले आहे का? त्यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते माहिती न ठेवता बदल्याचे राजकारण करत आहेत. मी या विरोधात राहुल गांधींवर युकेच्या कोर्टात खटला दाखल करणार आहे. मला खात्री आहे की ते माझ्याविरोधात सर्व ठोस पुरावे घेऊन येतील. राहुल गांधी स्वत:ला कसे मुर्ख बनवून घेतात हे मला पहायचे आहे. आर के धवन, सीताराम केसरी, मोतीलाल व्होरा, सतीश शर्मा, एनडी तिवारी रहे सर्व गांधी कुटुंबाशी संबंधीत आहेत. यांच्या परदेशात मालमत्या कशा आहेत? हे कमलनाथना विचारा”, असे ललित मोदीने म्हटले आहे.

आधीच मोदी वक्तव्यावरून राहुल गांधींची खासदारकी, पंतप्रधान पदाची उमेदवारी आदी सारे राजकीय करिअरच संकटात आलेले असताना आता ललित मोदीने दंड थोपटले आहेत. ललित मोदी यांनी राहुल गांधींना उघडपणे पप्पू म्हटले आहे. तसेच, राहुल गांधी आता सामान्य नागरिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना, इंदूरमध्ये मंदिराच्या विहिरीत २५ जण कोसळले