घरदेश-विदेश'सब याद रखा जाएगा, जवाब वक्त आने पर मिलेगा'; लालूंच्या मुलीचा केंद्र सरकारला इशारा

‘सब याद रखा जाएगा, जवाब वक्त आने पर मिलेगा’; लालूंच्या मुलीचा केंद्र सरकारला इशारा

Subscribe

पाटणाः यह अन्याय हम याद रखेंगे. सब याद रखा जाएगा, असा इशारा लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्विट करुन केंद्र सरकारला दिला आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन या भ्रष्टाचार प्रकरणी लालू यांच्या कुटुंबियांच्या घरी ईडीने शुक्रवारी छापे टाकले. रोहिणी यांच्या घरावरही ईडीने छापा टाकला आहे. ईडीच्या कारवाईनंतर रोहिणी आचार्य यांनी ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नहीं झुका लालू-राबडी परिवार, तुम लोगों के इस अन्याय का जवाब वक्त आने पर मिलेगा. अब यह सब बर्दाश्त से बाहर है, असेही रोहिणी आचार्य यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

रोहिणी यांनी ट्विटमध्ये कृष्ण आणि कंस यांच्यातील वादाची आठवण करुन दिली आहे. कंसाने एका गर्भवती मातेला त्रास दिला होता. त्याचे नंतर काय झाले, असे रोहिणी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

वेळ खूप बलवान असते. १५ वर्षांपूर्वीचे प्रकरण तुम्ही उकरून काढले आहे. जरा तरी लाज बाळगा. घरी लहान मुले आहेत. गर्भवती महिला आहे, याचे भान ठेवा, असेही रोहिणी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -