घरताज्या घडामोडीFodder Scam Case: चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी, सीबीआय न्यायालयाचा मोठा निर्णय

Fodder Scam Case: चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी, सीबीआय न्यायालयाचा मोठा निर्णय

Subscribe

चारा घोटाळ्याप्रकरणी आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं असून सीबीआय न्यायालयाने यासंदर्भातील मोठा निर्णय आज घेतला आहे. १९९६ साली झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी २६ वर्षानंतर निकाल लागला आहे.

चारा घोटाळा प्रकरणामध्ये तीन-चार प्रकरण आहेत. यामध्ये दोरांडा ट्रेझरीतील प्रकरण आहे. ज्यामध्ये सरकारी तिजोरीतून १३९ कोटी रूपये अवैध पद्धतीने काढल्याचा आरोप लालूप्रसाद यादव आणि इतर ९९ लोकांवर आहे. या प्रकरणामध्ये यादवांनी ३ वर्षांपेक्षा जास्त तुरूंगाचा कारावास भोगला आहे. काही दिवसांपुरते ते जामिनासाठी बाहेर आले होते. परंतु आता न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा तुरूंगात जावं लागणार की नाही, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. रांचीमधील विशेष न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना दोषी ठरवण्यात आलं असून त्यांना नेमकी शिक्षा काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

कोट्यवधी रूपयांच्या चारा घोटाळा संबंधित पाचपैकी चार प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादवांना आतापर्यंत दोषी ठरवण्यात आले आहे. देवगढ, चाईबासा, रांची डोरंडा ट्रेझरी आणि दुमका या चार घोटाळ्या प्रकरणांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला होता.

डोरंडा ट्रेझरीमधून बेकायदेशीररित्या पैसे काढल्याच्या प्रकरणात न्यायालयाने लालूंसह ९९ आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. याच प्रकरणात लालू सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र, या घोटाळ्यात अनेक धक्कादायक कारणे समोर आली आहे. सुमारे २३ वर्ष जुने हे प्रकरण १९९० ते १९९५ दरम्यान झारखंडच्या डोरंडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून १३९.३५ कोटी रूपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबतचे आहे.

- Advertisement -

रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३६ जणांना या प्रकरणी ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलंय. परंतु त्यांना शिक्षा होणार की नाही, याबाबत अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाहीये, अशी माहिती डोरांडा ट्रेझरी प्रकरणातील वकील संजय कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांना २१ फेब्रुवारी रोजी सीबीआय न्यायालय कोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात येणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : Fodder Scam Case: लालू प्रसाद यादवांच्या अडचणीत वाढ? चारा घोटाळा प्रकरणी आज अंतिम निकाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -