जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी प्रकरणी लालू यादव यांची सीबीआयकडून ३ तास चौकशी

lalu prasad yadav and rabri devi
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : रेल्वेत नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन बळकावल्याप्रकरणी लालू यादव यांची दिल्लीतील सीबीआयची चौकशी संपली आहे. सीबीआयच्या पथकाने लालूंची मुलगी मीसा भारतीच्या घरी 3 तास चौकशी केल्यानंतर सीबीआय आधिकारी तिथून गेले. त्यानंतर रोहिणी आचार्य म्हणाल्या की, जर वडीलांना त्रास झाला तर ते दिल्लीच्या सत्तेला हादरा पोहचवतील.

सिंगापूरमधून किडनी प्रत्यारोपणानंतर लालू यादव सध्या मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राहत आहेत. एका दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचीसुद्धा सीबीआयने त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी साडेचार तास चौकशी केली होती. यावेळी राबडी देवी यांना 48 प्रश्न विचारण्यात आले.

लँड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआयच्या आरोपपत्रावर न्यायालयाने लालू, राबडी आणि मिसा यांना समन्स बजावले होते. लालू यादव यांच्याशिवाय सीबीआयने राबडी देवी आणि इतर १४ जणांची आरोपपत्रात आरोपी म्हणून नोंद केली आहे. त्यांना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राबडी देवी यांना विचारण्यात आलेले काही प्रश्न
1. पाटण्यातील 8-9 लोकांकडून जमिनी घेऊन त्यांना नोकऱ्या दिल्या हा योगायोग आहे का? या सर्व लोकांना लालू कुटुंब कसे ओळखते.
2. स्व. किशुनदेव राय यांनी 2008 मध्ये पाटणा येथील 3375 चौरस फूट जमीन तुमच्या नावावर 3.75 लाख रुपयांना विक्री कराराद्वारे हस्तांतरित केली. त्यांच्या कुटुंबातील ३ जणांना मुंबई सेंट्रलमध्ये नोकरी देण्यात आली, याबाबत तुमचे काय म्हणणे आहे.
3. हजारी राय यांनी फेब्रुवारी 2007 मध्ये त्यांची जमीन दिल्लीतील एके इन्फोसिस्टम या कंपनीला 10 लाख 83 हजारांना विकली. हजारी राय यांचे दोन पुतणे जबलपूरमध्ये पश्चिम मध्य रेल्वेत नोकरीला होते. नंतर कंपनीच्या मालमत्तेचे सर्व हक्क तुमच्या व तुमच्या मुलीच्या नावे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर 2014 मध्ये तुम्ही कंपनीचे बहुतांश शेअर्स विकत घेतले आणि संचालक झालात.
4. जेव्हा तुमच्या कुटुंबाने जमीन घेतली तेव्हा ती रोखीने का खरेदी केली.
5. विक्री डीड आणि गिफ्ट डीडद्वारे घेतलेल्या 7 जमिनींचा सर्कल रेट 4.39 कोटींपेक्षा जास्त आहे. लालूंचे ओएसडी भोला यादव कोणते काम पाहत होते? याबाबत तुम्हाला माहीती आहे का?

सीबीआयने केलेले आरोप
नोकरीसाठी जमीन घोटाळा लालू यादव रेल्वेमंत्री असताना (2004 ते 2009) झाला. त्यानंतर सदस्यांच्या नावे जमीन आणि मालमत्ता हस्तांतरित केल्याचा सीबीआयचा आरोप आहे. त्या बदल्यात मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर या रेल्वेच्या वेगवेगळ्या झोनमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या. लालू कुटुंबाने ही मालमत्ता पाटण्यातील रहिवासी असलेल्या लोकांकडून घेतली किंवा ज्यांनी आपल्या नातेवाईकांची मालमत्ता विकून आपल्या नातेवाईकांच्या नावे लालू यादव यांना भेट म्हणून दिली.
अशा प्रकारे लालू यादव यांच्या कुटुंबीयांने बिहारमध्ये 1 लाख चौरस फूट जमीन केवळ 26 लाख रुपयांमध्ये विकत घेतली. त्यावेळच्या सर्कल रेटनुसार या जमिनीची किंमत सुमारे 4.39 कोटी रुपये होती, असे सीबीआयचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे जमीन हस्तांतरणाच्या बहुतांश प्रकरणांमध्ये जमीन मालकाला रोख रक्कम दिली जात होती. या प्रकरणी सीबीआयने मे 2022 मध्ये लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा नवीन गुन्हा दाखल केला होता.

राबरी आणि लालूंच्या चौकशीवर काही प्रतिक्रिया
1. मुलगी रोहिणी आचार्य हिने ट्विट करून सांगितले की, माझ्या वडिलांना सीबीआय सतत छळत आहे. त्यांना काहीही झाले तरी मी कोणालाही सोडणार नाही.
2. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, मी सुरुवातीपासून म्हणत आलो आहे की, सीबीआय, ईडी आणि आयटीने त्यांचे कार्यालय आमच्या घरात उघडावे. ते त्यांच्यासाठी सोईस्कर होईल. त्यांचा प्रवासाचा खर्चही वाचेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप विरोधकांवर छापे टाकत राहणार आहेत, असेही तेजस्वी यादव म्हणाले.
3. सुशील मोदी म्हणाले की, इकडे-तिकडे बोलण्याऐवजी तेजस्वी यादव आणि लालन सिंह हे जमीन मिळवलेल्या लालन चौधरींबद्दल का बोलत नाहीत? कोण आहे हे लालन चौधरी आणि त्यांची जमीन लालू कुटुंबाने भेट म्हणून का घेतली.
4. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा म्हणाल्या की, भाजपसमोर न झुकणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचा सीबीआयकडून छळ केला जात आहे.
5. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, विरोधकांच्या सरकारांना काम करू न देण्याचा प्रयत्न केला जात आहे.