घरदेश-विदेशलालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा; मुलगी मीसा भारतींची माहिती

लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा; मुलगी मीसा भारतींची माहिती

Subscribe

राहत्या घरी पडल्यानंतर सुरूवातीला तात्काळ उपचारांसाठी लालू प्रसाद यादव यांना पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) पाटणा येथील राहत्या घरात पायऱ्या चढताना पडले होते. तोल जाऊन पडल्याने त्यांच्या खांद्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे लालू प्रसाद यांना दिल्लीच्या (Delhi) एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. याबाबत त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. (lalu yadav is able to get up from the bed himself daughter misa bharti shares photo)

राहत्या घरी पडल्यानंतर सुरूवातीला तात्काळ उपचारांसाठी लालू प्रसाद यादव यांना पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने पाटण्याहून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयातील उपचारांना लालू प्रसार प्रतिसाद देत असून, ते स्वत: बेडवर बसत आहेत. याबाबत मीसा भारती यांनी एक फोटो शेअर करत माहिती दिली. तसेच, “कोणत्याही प्रकारच्या भ्रामक बातम्यांपासून दूर राहावे”, असे आवाहन मीसा भारती यांनी माहिती देताना केले आहे.

- Advertisement -

मीसा भारती यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “लालू यादव बेडवरून उठू शकतात. तुमच्या प्रार्थना आणि दिल्लीच्या एम्समधील चांगल्या वैद्यकीय सेवेमुळे लालू प्रसाद यांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होत आहे. आता तुमचे लालू यादव बेडवरून उठून बसू शकत आहेत. आधार घेऊन उभे आहेत”, असेही त्या म्हणाल्या.

याशिवाय, “तुमचे मनोबल आणि तुमच्या प्रार्थनांमुळे त्यांची प्रकृती आता बरी आहे. कृपया अफवांवर लक्ष देऊ नका. सोबत ठेवा, प्रार्थनेत त्यांची आठवण ठेवा.” यापूर्वी विरोधी पक्षनेते आणि लालूंच्या धाकट्या मुलाने ट्विट करून माहिती दिली होती.

- Advertisement -

तेजस्वी यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझे वडील लालू प्रसाद यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. ते सखोल वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सर्व हितचिंतक, समर्थक, कार्यकर्ते आणि देशवासियांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही भ्रामक बातम्यांबाबत काळजी करू नका”


हेही वाचा – शिंजो आबे यांना नरेंद्र मोदींसह अनेकांनी वाहिली श्रद्धांजली, भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -