लालूंना झटका; जामीन वाढवून देण्यास कोर्टाचा नकार

लालू प्रसाद यादव यांना जामीन देण्यास झारखंड उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव सध्या शिक्षा भोगत आहेत.

फोटो सौजन्य - Sanjeevni Today

तुम्हाला जामीन वाढवून येणार नाही. ३० ऑगस्टपर्यंत तुम्ही शरण या. असे स्पष्ट आदेश झारखंड उच्च न्यायालयानं बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळामध्ये शिक्षा भोगत असलेल्या लालूप्रसाद यादव यांना दिले आहेत. चारा घोटाळाप्रकरणी रांची कारागृहामध्ये लालूप्रसाद यादव सध्या शिक्षा भोगत आहेत. पण, प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी त्यांना जामीन देण्यात आला होता. सुरूवातीला दिल्लीतील एम्स रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरूच होते. मात्र, त्यांनतर त्यांना मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या जामीनाची मुदत २० ऑगस्ट रोजीच संपली आहे. ही जामीनाची मुदत आणखी तीन महिने वाढवावी. अशी विनंती लालूप्रसाद यादव यांनी केली होती. मात्र न्यायालयानं ही विनंती फेटाळून लावली आहे. त्यंना आता लालूंना पुन्हा रांची येथील रुग्णालयात हलवण्यात येणार असल्याची माहिती लालू प्रसाद यादव यांच्या वकिलांनी दिली आहे.