घरCORONA UPDATECovid-19 विरोधातील लढाई जिंकण्यासाठी Lancet दिले भारताला ८ सल्ले, जाणून घ्या

Covid-19 विरोधातील लढाई जिंकण्यासाठी Lancet दिले भारताला ८ सल्ले, जाणून घ्या

Subscribe

भारतात एक नवीन रुपात कोरोनाची लाट ग्रामीण भागत सुरु होत आहे लॅन्सेटचा दावा

देश गेल्या दीड वर्षांपासून कोरोना (covid-19) महामारीशी झुंज देत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव हा भारतात दिसून आलेला आहे. कोरोना महामारी विरोधातील लढाई जिंकण्यासाठी Lancet च्या विशेषतज्ज्ञांच्या एका समूहाने भारताला काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. हे सल्ले लक्षात ठेवून भारताने पुढील पाऊले उचलावी असे lancet कडून सांगण्यात आले आहे. लँसेंटने त्यांच्या मेडिकल जर्नलमध्ये अनेक उपाययोजनांचा दिल्या आहेत. त्यात त्यांनी असा दावा केला आहे की, भारतात एक नवीन रुपात कोरोनाची लाट ग्रामीण भागत सुरु होत आहे. केंद्र सरकारने हे सल्ले  तात्काळ अमलात आणण्याच्या सूचना लॅन्सेटकडून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा पातळीवर स्वतंत्र देऊन कोरोना विषयी जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. लॅन्सेटने भारताला दिलेले ते ८ सल्ले नेमके आहेत तरी काय? जाणून घ्या. (Lancet gave 8 tips to India to win the battle against Covid-19)

लॅन्सेटने भारताला दिलेले ते ८ सल्ले

  1. आरोग्य सेवा संस्थांचे विकेंद्रीकरण करण्याचा सल्ला लॅन्सेटकडून देण्यात आलाय. आरोग्य सेवांची स्थिती प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आहे. जिल्हा पातळीवर परिस्थितीनुसार काम करण्याची सूट देण्यात यावी. फंड पासून हेल्थ सिस्टिम आणि फ्रंटलाइन वर्कर्सपर्यत सहजतेने पोहचू शकेल.
  2. अहवालात राष्ट्रीय किंमत धोरणाचीही शिफारस करण्यात आली आहे. लॅन्सेटने भारतात, औषधे, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा यासारख्या वस्तूंच्या किंमतींसाठी काही किंमत निश्चित करावी. रुग्णालयांसाठी वेगळी किंमत असू नये. आरोग्य विमा यांसारख्या योजनेद्वारे नागरिकांना सुरक्षा देण्यात यावी.
  3. कोरोना व्यवस्थापनाविषयी स्पष्ट माहिती, त्याचे पुरावे नागरिकांसमोर सादर करावे. सर्व स्थानिक भाषांमध्ये नागरिकांना माहिती देण्यात यावी. म्युकरमायकोसिस सारख्या बुरशीजन्य आजाराविषयी नागरिकांना योग्य माहिती द्यावी.
  4. कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी खासगी क्षेत्रातही आरोग्याच्या पायाभूत सुविधा वापरल्या जाणे महत्त्वाचे असल्याचे लॅन्सेटने म्हटले आहे. नागरिकांचे मानसिक आरोग्य, वैद्यकीय मदतीसाठी सल्ला द्यावा.
  5. सामुदायिक सहभाग आणि लोकसहभाग या भारतात केंद्रस्थानी हवा. सरकारी आणि नागरी संस्थांनी संघटनांमधील सक्रीय सहाकार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
  6. भारतात लसींचा मुबलक पुरवठा उपलब्ध झाल्यानंतर सर्वात प्रथम लस कोणाला द्यायची हे सरकार ठरवावे. लसीकरणाची जबाबदारी खासगी क्षेत्राकडे सोपवू नका, लसींची बाजार किंमत निश्चित करावी.
  7. जिल्ह्यांना कृतिशीलपणे तयार करण्यासाठी सरकारी आकडेवारी आणि मॉडेलिंगमध्ये पारदर्शकता ठेवावी. आरोग्य कर्मचाऱ्यांना त्याच्या वयानुसार आणि लिंगानुसार कोविड ड्युटीसाठी रुग्णालयात पाठवा. रुग्णदर आणि मृत्यूदर याचा आवश्यक डेटा तयार करा.
  8. कोरोना महामारीत आपली नोकरी गमावलेल्य नागरिकांना आर्थिक मदत करा.

हेही वाचा – North Korea Lockdown : दक्षिण कोरियात शॅम्पू मिळतोय २०० डॉलर्सला !

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -