घरCORONA UPDATELancet च्या मोदी सरकारला सूचना, कोरोना नियंत्रणासाठी सुचवला ८ सूत्री कार्यक्रम

Lancet च्या मोदी सरकारला सूचना, कोरोना नियंत्रणासाठी सुचवला ८ सूत्री कार्यक्रम

Subscribe

लस खरेदीपासून वितरणापर्यंत मध्यवर्ती यंत्रणा करण्याचे सुचविण्यात आले आहे

भारतात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. कोरोना संसर्गाचा भारतावार फार वाईट परिणाम झाला आहे. भारतात आतापर्यंत तीन कोटी बाधितांची नोंद झाली आहे. तर ३ लाखांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटिश सायन्स जनरल लँन्सेटच्या सिटीझन पॅनेलने केंद्र व राज्य सरकारला कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी  काही महत्त्वाच्या ८ सूचना पाठवल्या आहेत. लस खरेदीपासून वितरणापर्यंत मध्यवर्ती यंत्रणा करण्याचे सुचविण्यात आले आहे. काय आहेत त्या महत्त्वाच्या ८ सूचना जाणून घ्या. (Lancet suggestion to Modi government, suggested 8-point program for corona control)

  • राज्य सरकारने लस विकत घेत केंद्र सरकराने स्वत: लस विकत घ्यावी आणि ती मोफत द्यावी. औषधे, रुग्णालयांचे शुल्क ठरवावे.
  • अंतिम वर्षांच्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना, खासगी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कोरोना सेवेत रुजू करा.
  • रुग्णालये, ऑक्सिजन आणि औषधांच्या किंमतीत पारदर्शकता असायला हवी.
  • खोट्या बातम्या देणे थांबवा. पुराव्याच्या आधारे लोकांना माहिती द्या.
  • राज्य सरकारने लसीकरण करण्याची प्राथमिकता तयार करायला हवी.
  • देशातील कोरोनाच्या आकडेवारीत पारदर्शकता हवी.
  • या काळात नोकरी गमावलेल्या आर्थिक मदत मिळाली पाहिजे.
  • खासगी क्षेत्रात आरोग्य यंत्रणेतील सर्वांसाठी संरक्षण उपकरणे,विमा आणि मानसिक आरोग्यासाठी सहाय्य करावे.

लॅन्सेट सिटीझन पॅनेलमध्ये जगभरातील २१ तज्ज्ञ आहे. यापैंकी बायोकॉनचे किरण मजुमदार, वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रो. गगनदीप कांग, देवी शेट्टी, नारायण हृदयालय , हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे तरुण खन्ना आणि प्रा. विक्रम पटेल यांचा देखील समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लक्ष्मी मित्तल आणि कौटुंबिक साउथ आशिया संस्था आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वात पॅनेल तयार करण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Aadhar card प्रिंट बंद केल्याची UIADI ची मोठी घोषणा, आधार कार्डला आता नवा पर्याय

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -