Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश देशाला धूमकेतूवरही उतरवून संशोधन..., ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

देशाला धूमकेतूवरही उतरवून संशोधन…, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एक अजब रसायन आहे. चांद्रयानाने ऐतिहासिक यश मिळविले तेव्हा मोदी हे दक्षिण आफ्रिकेत होते. यावर मोदी यांनी परदेशातून संदेश दिला की, ‘‘भारताने ऐतिहासिक यश मिळविले आहे. मात्र आता तेवढ्याने समाधान होणार नाही. आता सूर्य-शुक्रासह विविध ग्रह भारताचे लक्ष्य असेल.’’ पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागतच करायला हवे. चंद्रानंतर देशाला त्यांनी शुक्रावर, सूर्यावर कदाचित धूमकेतूवरही उतरवून संशोधन करायचे ठरविले आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाने पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Brics Summit Council : लडाखमधील LACबाबत मोदींकडून चिंता व्यक्त; चीनी सैन्य लवकरच घेणार माघार?

- Advertisement -

पंतप्रधानांचे लक्ष्य सूर्यावर उतरण्याचे आहे, पण देशातील 140 कोटी जनतेचे लक्ष्य महागाई, बेरोजगारी आहे. अनेकांचे लक्ष्य कांद्याच्या वांध्यावर आहे. चंद्रावर, सूर्यावर यान उतरल्याने या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गती मिळणार असेल तर आनंदी आनंदच आहे. 1962पासून भारताचा अंतराळ संशोधन कार्यक्रम नवनवीन भरारी घेत आहे. त्याचे फलित म्हणजे ‘चांद्रयान’ सुखरूप चंद्रावर उतरले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंचा अपेक्षित यु टर्न! म्हणतात, अजितदादा आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट नाही

- Advertisement -

सामान्य जनता महागाई, बेरोजगारीचे चटके सहन करीत आला दिवस ढकलीत आहे. राज्यकर्ते मात्र गुरुवारी शास्त्रज्ञांना बोलू देण्याऐवजी स्वतःच्या भाषणाची टिमकी वाजविण्यात आणि नंतर चांद्रयानाच्या यशाची पुंगी वाजविण्यात मग्न आहेत. ‘मिशन मून’नंतर ‘मिशन सन’, ‘मिशन शुक्र’ अशा नवनवीन स्वप्नांच्या भुलभुलैयात जनतेला गुंतवीत आहेत. ‘मिशन सन’ वगैरे ठीक आहे, पण सध्या भरकटलेले कांद्याचे ‘यान’देखील नीट ‘लॅण्ड’ होणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा! नाहीतर 2024 मध्ये तुमचे सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हालाही कळणार नाही, असा सल्लाही ठाकरे गटाने मोदी सरकारला दिला आहे.

- Advertisment -