घरताज्या घडामोडीहिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

Subscribe

किनौर येथे कोसळलेल्या दरडीचा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आलाय

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किन्नौर येथील बटसेरी येथे दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर गखमी झालेत. (Landslide in himachal pradesh Kinnaur district,9 killed, 3 injured) या दुर्घटेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. रेस्क्यू टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली आहे. त्याचप्रमाणे पोलीस आणि स्थानिक प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. बटसेरी येथे असेलेला पूल दरड कोसळल्याने पूर्णपणे तुटून जमिनदोस्त झाला आहे. डोंगरालगत उभ्या असेलल्या वाहनांचे देखील यात मोठे नुकसान झाले आहे. इंडो तिबेट सीमा पोलीस किन्नौरी बटसेरा गावातील घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड कोसळून मृत्यू झालेले ९ लोक हे पर्यटक असून ते छत्तीसगड येथील होती अशी माहिती समोर येतेय. एकूण १२ प्रवासी होते त्यातील ९ जणांचा मृत्यू झालाय. ३ जखमींमध्ये बटसेरा येथील काही नागरिक आहेत.

हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा 

- Advertisement -

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी किन्नौर जिल्हा प्रशासनाशी बातचीत करुन घटनेचा आढावा घेतला.  प्रशासनाने घटनास्थळी बचावकार्य सुरु केले असून दुर्घटनेत अडकलेल्या यामुळे दिलासा मिळाला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीसाठी मी देवाजवळ प्रार्थना करतो, असे ट्विट हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी केले आहे.

- Advertisement -

 

काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल 

किनौर येथे कोसळलेल्या दरडीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून एकच थरकाप उडत आहे. रविवारी दुपारी १:३० वाजता घडली. डोंगरावरचा बराच मोठा भाग या ठिकाणी कोसळून पडला आहे. याच वेळी रस्त्यावरुन काही वाहने जात होती त्यातून छत्तीसगड येथील नागरिक वाहनातून जात होते. त्याच्यावरही ही दरड कोसळली आणि १२ पैकी ९ जणांचा यात मृत्यू झाला. तर शेतात काम करणारी तिथली एक स्थानिक व्यक्ती या दुर्घटनेत जखमी झालीय. अनेक घरांचे या नुकसान झालेय. गेल्या अनेक दिवसांपासून हिमाचलमध्ये पाऊस सुरु आहे. पावसाने हिमाचलमध्ये देखील पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

 पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे भूस्खलन होऊन मोठी हानी झालीय. या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले. हिमाचल प्रदेशमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दु:खी आहे. ज्यांनी यात प्राम गमावले त्यांच्या कुटुंबीयाबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच अपघातात जखमी झालेल्याच्या उपाचारासाठी सर्व व्यवस्था केली जात आहे,असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – देव तारी त्याला कोण मारी, चोवीस तास ढिगाऱ्याखाली राहूनही ६५ वर्षीय आजी बचावल्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -