Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश हिमाचलमध्ये भूस्खलन; 7 इमारती कोसळल्या, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

हिमाचलमध्ये भूस्खलन; 7 इमारती कोसळल्या, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Subscribe

कुल्लू : हिमाचल प्रदेशमध्ये भुस्खलनाची मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशच्या कुल्लू आनी उपमंडल या भागात भुस्खलनाची मोठी घटना घडली आहे. यामुळे अनेक इमारती एकापाठोपाठ एक इमारत जमीनदोस्त झाल्या आहेत. या दुर्घटनेत असंख्य लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हा भूस्खलनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुल्लू जिल्ह्यातील आनी बस स्टँड जवळ ही दुर्घटना घढली आहे. ही घटना आज सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी घडली आहे. या दुर्घटनेत 7 इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बचाव कार्यात अडथळ येत आहे. या दुर्घटनेमुळे कुल्लू-मंडी मार्गावर वाहने अडकली आहेत. कुल्लू आणि मंडी जाणाऱ्या मार्गाचे नुकसान झाले आहे. यामुळे डोंगळार रस्त्याचा पर्याय मार्गचे सुद्धा नुकसान झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी साक्षी वर्मा यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayan 3 बाबत गेहलोत सरकारमधील मंत्र्याचे अज्ञान; लोकांनी लावला डोक्याला हात, युझर्सनी केले ट्रोल

राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार,यंद पावसामुळे हिमाचल प्रदेशाची एकूण 709 रस्ते बंद झाली. पावसामुळे 2,022 घरांचे पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. तर 9,615 घरांचे थोडेसे नुकसान झाले आहे. राज्यात 113 भूस्खलनाचीही नोंद झाली आहे. ज्यामुळे पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. एका सरकारी बुलेटिनमध्ये पावसामुळे 224 जणांचा मृत्यू झाला, तर पावसाशी संबंधित अपघातांमध्ये 117 जणांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

- Advertisment -