घरCORONA UPDATEदेशभरात दारूच्या दुकानांवर मोठी गर्दी; दिल्लीत काही तासानंतर दुकाने बंद!

देशभरात दारूच्या दुकानांवर मोठी गर्दी; दिल्लीत काही तासानंतर दुकाने बंद!

Subscribe

सकाळपासूनच लोक दारूच्या दुकानांच्या बाहेर जमु लागले. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की या काळात सोशल डिस्टंसिंग पाळले जावे. प्रत्यक्षात मात्र या नियमाचे उल्लंघन होताना दिसले.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे देशातील बर्‍याच राज्यांत मद्यविक्रीच्या दुकानांसमोर कित्येक किलोमीटर रांग दिसली. सकाळपासूनच लोक दारूच्या दुकानांच्या बाहेर जमु लागले. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की या काळात सोशल डिस्टंसिंग पाळले जावे. प्रत्यक्षात मात्र या नियमाचे उल्लंघन होताना दिसले. परिणामी अनेक ठिकाणी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचे जगभरात कौतुक झाले. मात्र लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेताच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होऊ लागल्याने चिंता वाढली आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणेच सोमवारीही दिल्लीत दारूची दुकाने उघडली, मात्र तेथे अराजकांचे वातावरण होते. लोक सोशल डिस्टंसिंग पाळत नव्हते. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी पोलिसांनी लाठीमार केला. वाढत्या गर्दीनंतर दिल्ली पोलिसांनी अनेक दारूची दुकाने बंद केली. लखनऊसह उत्तरप्रदेशात इतर शहरांमध्ये दारूची दुकाने उघडण्यापूर्वीच दुकानाबाहेर लांबच लांब रांग लावल्या होत्या, यावेळी, अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाले. प्रयागराजमध्ये, बरेच दिवसांपासून बंद असलेल्या दारूचे दुकान उघडण्यापूर्वी लोकांनी पूजा केली आणि नारळ अर्पण केला.
सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार रायपूरच्या मोवा भागात दारूची दुकाने उघडली. दुकानाबाहेर दारू विकत घेण्यासाठी लोकांच्या लांब रांगा दिसल्या. येथेही पोलिसांना त्यांच्यात सामाजिक अंतर राखण्यात बरीच अडचण आली.
आंध्रप्रदेशातही लोक मोठ्या संख्येने मद्यपान करतात. कृष्णा जिल्ह्यातील मुप्पला गावात दारू खरेदी करण्यासाठी लोक सकाळपासूनच लांब रांगा लावून उभे होते. गर्दी इतकी वाढली की लोकांमध्ये सामाजिक अंतर राखण्यात पोलिसांना त्रास सहन करावा लागला. देहरादूनमध्ये दारूच्या दुकानाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. लोकांमध्ये सामाजिक अंतर राखण्यासाठी येथे पोलीस दलाची तैनात करण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -