घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानमधून मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढण्यात आलेय, ब्रिटनच्या पंतप्रधानांची माहिती

अफगाणिस्तानमधून मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढण्यात आलेय, ब्रिटनच्या पंतप्रधानांची माहिती

Subscribe

ब्रिटन सरकार अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.

ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris johnson) यांनी गुरुवारी अफगाणिस्तच्या (Afganistan) काबुल विमानतळावरुन (Kabul Airport) मोठ्या संख्येने नागरिकांना बाहेर काढल्याची माहिती दिली आहे. (Large numbers of people have been evacuated from Afghanistan) ब्रिटिश सरकारने गुरुवारी इस्लामिक देशाचे आंतकवाद्यांकडून अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर जमा झालेल्या लोकांना निशाणा करुन त्यांच्यावर आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता असल्याची चेतावणी दिली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान जॉनसन यांनी ब्रिटन सरकार अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असल्याचे सांगितले आहे.

उत्तर लंडममध्ये ब्रिटिश सेनेच्या स्थायी संयुक्त मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये बचाव अभियानात समील झालेल्या सैनिकांशी बातचीत केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रिटेन सैनिकांनी आतापर्यंत १५,००० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला फार कमी वेळेत अफगाणिस्तानमधून लोकांना बाहेर काढायचे आहे. सर्वांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

- Advertisement -

अमेरिकेचे सैन्य सध्या काबुल विमानतळावर तैनात आहे. अमेरिकी सैन्याला ३१ ऑगस्टपर्यंत काबुलमधून बाहेर जाण्याची चेतावणी तालिबान्यांकडून देण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी मुदत वाढवण्यासाठी जॉनसन मित्र राष्ट्रांकडून विनंती नाकारली आहे. अमेरिकेची मुदत संपली म्हणजे ब्रिटेनचे प्रयत्न संपले असे होत नाही. अफगाणिस्तानमधील लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढण्याचा हा तर पहिला टप्पा असल्याचे जॉनसन यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – काबुल विमानतळावर बॉम्बस्फोट, लहान मुलांसह १३ जण ठार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -