घरदेश-विदेशआयातदार भारताकडून पेट्रोलियम उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात

आयातदार भारताकडून पेट्रोलियम उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात

Subscribe

नवी दिल्ली : कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश होतो. भारत आपल्या गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात करतो, तर केवळ 20 टक्के उत्पादन भारतात होते. विशेष म्हणजे, तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार तेलाचा प्रमुख आयातदार असण्याबरोबरच पेट्रोलियम उत्पादनांची निर्यातही वाढली आहे.

सर्वाधिक तेलाची खरेदी भारत आपला जवळचा मित्र रशियाकडून करतो. पेट्रोल आणि डिझेलची बहुतांश गरज विदेशातून आयात केलेल्या कच्च्या तेलातून भागवली जाते. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 119 अब्ज डॉलरचे कच्चे तेल आयात केले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत कच्च्या तेलावरील हा खर्च जवळपास दुप्पट आहे.

- Advertisement -

तेल आयातीमध्ये भारत हा तिसरा क्रमांकाचा देश आहे. देशाच्या मजबूत रिफायनिंग क्षमतेमुळे, प्रमुख आयातदार देश असलेल्या भारताच्या पेट्रोलियम निर्यातीतही वाढ होत आहे. भारताकडून पेट्रोल, डिझेल, एलपीजी यासारख्या तयार उत्पादनांची निर्यात केली जाते. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 42.3 अब्ज डॉलर्सची पेट्रोलियम उत्पादने निर्यात केली. या कालावधीत भारताची पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात 61.8 दशलक्ष टन होती.

कच्च्या तेलाची आयात केल्यावर त्याचे शुद्धीकरण करून या उत्पादनांची नेदरलँड, ब्राझील, काँगो, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, फ्रान्स, अमेरिका, चीन यासह अन्य देशांना निर्यात केली जाते. भारताच्या एकूण निर्यातीत पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीचा हिस्साही वाढत आहे. यावर्षी एप्रिल-ऑगस्ट दरम्यान, भारताच्या एकूण निर्यातीमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा वाटा 21.2 टक्क्यांपर्यंत वाढला. जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे.

- Advertisement -

देशातील पेट्रोलियम पदार्थांची निर्यातही हळूहळू वाढत आहे. जामनगर येथे असलेली रिलायन्सची रिफायनरी ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी असून येथे परदेशातून कच्च्या तेलाची खरेदी करून त्याचे शुद्धीकरण करण्यात येते. येथे एका दिवसात सुमारे 13,60,000 बॅरल कच्चे तेल शुद्ध केले जाते. यातील बहुतेक उत्पादने निर्यात होतात. रिलायन्स तसेच खासगी क्षेत्रातील रिफायनरीज मोठ्या प्रमाणात रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करतात.

भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रिफाइन केलेली पेट्रोलियम उत्पादने आहेत. पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत भारत पहिल्या 10 देशांमध्ये आहे. वाणिज्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत गैर-पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत 8.1 टक्के, तर पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत 22.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -