घरदेश-विदेशभारताविरुद्ध तरुणांची फौज उभी करणारा 'लष्कर'चा दहशतवादी ठार; हाफिज सईदला मोठा...

भारताविरुद्ध तरुणांची फौज उभी करणारा ‘लष्कर’चा दहशतवादी ठार; हाफिज सईदला मोठा धक्का

Subscribe

पेशावर : पाकिस्तानातून आणखी एका दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अक्रम खान उर्फ ​​गाझीची हत्या केली आहे. अक्रमची हत्या हा आयएसआय तसेच लष्कर प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. (Lashkar terrorist Akram Khan alias Ghazi who raised youth army against India killed A big blow to Hafiz Saeed)

हेही वाचा – धनत्रयोदशीला 30 मिनिटांत दरोडेखोर झाले श्रीमंत; 20 कोटींचे दागिने लुटले

- Advertisement -

अक्रम खान उर्फ गाझीची खैबरच्या बाजौरमध्ये डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही. एका आठवड्यात दहशतवादी मारण्याची ही दुसरी वेळ आहे. गाझी 2018 ते 2020 या काळात लष्कराच्या दहशतवादी भरती युनिटचा प्रमुख होता. लश्करसाठी गाझी हा भारताविरुद्धचा सर्वात महत्त्वाचा दहशतवादी होता. खोऱ्यातील तरुणांना भारताविरुद्ध प्रभावीपणे भडकवू शकतो, असा संघटनेचा विश्वास होता. तो अनेकदा भारताविरुद्ध विष ओकत होता. गाझी काश्मीरमधील तरुणांना भडकवायचा आणि संघटनेत भरती करायचा. त्यानंतर तो या तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करायचा. त्यामुळे अक्रमची हत्या आयएसआय तसेच लष्कर प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

पाकिस्तानी मीडियाने ‘इस्लामिक गुरिल्ला टार्गेट किलिंग’ संबोधले

याआधी 2018 मध्ये भारतीय लष्कराच्या सुंजवा मिलिटरी कॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या ख्वाजा शाहिदची हत्या करण्यात आली होती. पीओकेजवळ शाहिदचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. गाझी आणि शाहिदच्या आधी, लष्कर कमांडर रियाझ अहमदला सप्टेंबरमध्ये पीओकेच्या रावळकोटमधील लष्कराच्या अल कुद्दूस मशिदीबाहेर मारले गेले. तो पीओकेमध्ये लष्कराच्या भरतीचे काम हाताळत होता. कासिम काश्मिरीने राजौरी आणि पूंछ भागात भरती करून खोऱ्यात ‘लाँचिंग कमांडर’ म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. पाकिस्तानी मीडियाने या सर्व हत्यांना ‘इस्लामिक गुरिल्ला टार्गेट किलिंग’ असे संबोधले आहे.

हेही वाचा – …तर आता आम्ही ‘तो’ सीनच लिहू शकलो नसतो; जावेद अख्तरांनी सहिष्णुतेच्या मुद्द्यावर ठेवले बोट

शीर्ष कमांडरची सहावी हत्या

गाझीची हत्या ही या वर्षातील लष्कराच्या एका शीर्षस्थानी तिसरी हत्या आहे, तसेच सीमेपलीकडून कार्यरत असलेल्या शीर्ष कमांडरची सहावी हत्या आहे. या वर्षी मार्चमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका टॉप कमांडरची पाकिस्तानातील रावळपिंडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याआधी फेब्रुवारीच्या सुरुवातीला अज्ञात बंदुकधारींनी कराची बंदर शहरात अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा याची गोळ्या झाडून हत्या केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला इस्लामिक स्टेट (IS) चा टॉप कमांडर म्हणून काम करणारा काश्मिरी दहशतवादी एजाज अहमद अहंगर अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात तालिबानने ठार केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -