Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग NTPC Recruitment: इंजिनिअरींग एग्झीक्यूटिव्ह ट्रेनीच्या २८० पदांवर भरती; आजच करा अर्ज

NTPC Recruitment: इंजिनिअरींग एग्झीक्यूटिव्ह ट्रेनीच्या २८० पदांवर भरती; आजच करा अर्ज

Related Story

- Advertisement -

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ( National Thermal Power Corporation, NTPC) मधील अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थींच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच म्हणजे १० जून २०२१ आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आज अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.ntpccareers.net वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शेवटच्या तारखेनंतर म्हणजे उद्या कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यावी, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

NTPC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरती मोहिमेद्वारे अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी म्हणजेच इंजिनिअरींग एग्झीक्यूटिव्ह ट्रेनीची एकूण २८० पदांची भरती करण्यात येणार आहेत. यापैकी ९८ पदे इलेक्ट्रिकलची, १२६ मेकेनिकलची आणि ५६ पदे इलेक्ट्रॉनिक / इन्स्ट्रुमेंटेशन ट्रेनी पदांची आहेत. NTPC भरतीसाठी अर्ज करण्यासाठी जनरल आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे कमाल वय २७ आहे. तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार सूट देण्यात येणार आहे.

अर्ज करण्यासाठी लागणारी फी

- Advertisement -

जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना एनटीपीसी भरतीसाठी अर्ज फी ३०० रूपये भरावी लागणार आहे. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी आणि एक्सएमएस श्रेणीतील उमेदवार आणि महिलांना अर्ज शुल्काच्या भरतीत सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया

अभियंता कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना गेट २०२१ च्या निकालाच्या आधारे निवडण्यात येईल, त्याचबरोबर या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन भेट देऊ शकतात.

- Advertisement -