पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचं हे पहिलचं वर्ष आहे.

पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचं हे पहिलचं वर्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते जॅकी श्रॉफ आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनाही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

यावर्षीपासून सुरू झालेल्या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार देण्यात आला आहे. तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

यंदा वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विान मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारा’ने गौरवण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ गायिका – संगीतकार मीना खडीकर, ज्येष्ठ गायिका – संगीतकार उषा मंगेशकर यांच्यासह वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना मंगेशकर कु टुंबीयांकडून हा पुरस्कार दिला जातो.


हेही वाचा – “एक होतं माळीण”मधून मोठ्या पडद्यावर दिसणार माळीण गावातील दुर्दैवी सत्यकथा