ही लोक तीनशे फूट उंचावर काढताहेत झोपा

बर्याचदा काही लोकांना उंचीवरून खाली पाहताना चक्कर येते. इंग्रजीत याला ‘हाइट फोबिया’ म्हणतात. ज्यामुळे उंचावरून पाहिल्याने भिती वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का? की जगात अशी एक जागा आहे, जिथे माणसं जमिनीपासून सुमारे ३०० फूट उंचीच्या पलंगावर झोपू शकतो.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन मुली उंच्यावरच्या पलंगावर आराम करताना दिसत आहे. हे दृष्य चीनच्या ‘वॉन्शेंग ओर्डोविशियन थीम पार्क’ मधले आहे. संपूर्ण जगाच लक्ष या पलंगाला आकर्षित करणारे आहे. जमिनीपासून सुमारे ३०० फूट उंचीवर जाड तारांनी बांधलेला आहे. जेणेकरून त्यावर झोपलेल्यांच्या जीवाला धोका होऊ नये.

३०० फूट उंचीवर वारा देखील खूप जोरात वाहतो. अशा परिस्थितीत जेव्हा वारा वाहतो तेव्हा हा पलंग हलयला लागला की, त्यावर झोपलेले लोक आपला श्वास थांबवूण ठेवतात. थीम पार्क चीनच्या किजियांग शहरात आहे. जिथे एडवेंचरसाठी इतर अनेक गोष्टी आहेत. एडवेंचरसाठी ‘हँगिंग बेड’ शिवाय काचेचा पूल आहे. त्याच बरोबर गॅप ब्रिज आणि क्लिफ स्विंग सारख्या गोष्टी देखील आहेत.

हँगिंग बेडप्रमाणेच, काचेच्या पुलावर आणि गॅप ब्रिजवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही ब्रिजवर मोठ्या तारांनी बांधले आहेत. त्याच बरोबर त्यावर चालणाऱ्या लोकांना सेफ्टी बेल्ट लावण्यात येतात. या पुलांना सामोरे जाताना तुम्ही कितीही सुरक्षा पट्टे घातले असले तरी, खाली पाहताच तुमचे पाय थरथर कापू लागतील. पुलाच्या मधोमत अडकल्यानंतर तुम्हाला तुमच्या धाडसाचा एकदा तरी नक्की पश्चाताप होईल. हे थीम पार्क वर्षभर पर्यटकांनी भरलेले असते. लोक मित्र आणि कुटुंबासह आठवड्याच्या शेवटी या साहसी ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी येत राहतात.