नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी ऑईल मार्केट कंपनीनं गॅसदरात कपात करत ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरची किंमत कमी केली आहे. त्यामुळे हॉटेल आणि अन्य व्यावसायिकांना फायदा होणार आहे. तब्बल सहा महिन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाली आहे.
ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2025 पासून व्यावसायिक गॅस सिलिंडर 14.50 रूपयांनी स्वस्त झाला आहे.
दुसरीकडे मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना कोणताही दिलासा देण्यात आला नाही. 1 मार्च 2024 ला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 100 रूपयांनी कपात केली होती. त्यानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाली नाही.
शहरानुसार कसे असतील नवे दर…
मुंबई : 1756
चेन्नई : 1966
कोलकाता : 1911
दिल्ली : 1804