घरताज्या घडामोडीGold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

Gold Price Today: आठवड्याच्या शेवटी सोनं महागलं; जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

Subscribe

आठवड्याच्या अखेरीस सोन्याला झळाली मिळाली असून आज शुक्रवारी सोन्याच्या वायद्याच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे. एमसीएक्सवर ऑगस्टमध्ये डिलिव्हरीसाठी असलेले सोने सकाळी १८९ रुपयांच्या वाढले. दुपारी साडे बारा वाजता हा भाव १०९ रुपयांच्या वाढीसह म्हणजेच साधारण ०.२३ टक्क्यांनी वाढून प्रति १० ग्रॅम, ४७ हजार ६७ रुपयांवर होता. सकाळच्या वेळात हा सोन्याचा भाव सर्वाधिक ४७ हजार ३८७ रुपये आणि किमान ४६ हजार ९६२ रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे चांदीच्या किंमतीही वाढताना दिसत आहेत. सकाळी साडेबारा वाजता जुलै महिन्यात वितरीत होणारी चांदी ५४४ रुपयांनी वाढून ६८ हजार १४३ रुपये प्रतिकिलो अशी ट्रेड करत होती.

गुंतवणूकीसाठी सुवर्णसंधी

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोने ५६ हजार रुपयांच्या वर गेले होते, परंतु त्यानंतर सोनं साधारण ८ हजार रुपयांनी घसरले. मात्र तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या घसरणीमुळे सराफा गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी आहे. ही घसरण सोन्यामधील गुंतवणूकीची संधी म्हणून पाहिली पाहिजे कारण या वर्षाच्या अखेरीस सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ५३ हजार ५०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.

- Advertisement -

कधीपर्यंत सोन्याच्या दरात होणार घट

तज्ज्ञांच्या मते, सोनं सध्या कंसोलिडेशनच्या टप्प्यातून जात आहे आणि पुढच्या एका महिन्यात सोन्याचा दर हा ४८ हजार ३०० ते ४९ हजार ५०० रुपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूकीची संधी म्हणून हा विचार केला पाहिजे, असेही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे. कारण सोन्याचा मीडियम टर्म लुक सकारात्मक असून सोनं ५१ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती घसरल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षी सोन्याला आली होती झळाळी

गेल्यावर्षी २०२० मध्ये सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होण्याचे कारण म्हणजे कोरोना व्हायरस. ज्यामुळे लोक गुंतवणूकीसाठी सुरक्षित स्थान शोधत होते. सोन्यात गुंतवणूक करणे नेहमीच सुरक्षित असते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनामुळे लोकांनी शेअर बाजारातील गुंतवणूक कमी केली कारण शेअर बाजारात गुंतवणूक करणे काहींना धोकादायक वाटत होते. गेल्या वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सोन्याने हळूहळू वाढ केली होती, परंतु मार्चमध्ये भारतात कोरोनाने देशात कहर करण्यास सुरूवात केली आणि सोन्याला पुन्हा झळाळी आली.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -