घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींना उद्योगपती अंबानी पिता-पुत्राकडून 5G सेवेचे प्रात्याक्षिक

पंतप्रधान मोदींना उद्योगपती अंबानी पिता-पुत्राकडून 5G सेवेचे प्रात्याक्षिक

Subscribe

भारतात आज 5G इंटरनेट सेवेचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेचे उद्घाटन करण्यात आले असून, दिल्लीतील प्रगती मैदानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G सेवेचा स्वत: अनुभव घेतला.

भारतात आज 5G इंटरनेट सेवेचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G इंटरनेट सेवेचे उद्घाटन करण्यात आले असून, दिल्लीतील प्रगती मैदानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5G सेवेचा स्वत: अनुभव घेतला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींना या 5G इंटरनेट सेवेचे प्रात्याक्षिक मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र आकाश अंबानी यांनी दिले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Launched 5g Service pm na Modi Mukesh Ambani Anil Ambani Demo)

उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र आकाश अंबानी यांनी प्रगती मैदान येथे नरेंद्र मोदी यांना ही 5G सेवा नेमकी कशी काम करते, फायदे काय,कोणत्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो? यासंदर्भातली माहिती दिली.

- Advertisement -

देशभरातील 13 मोठ्या शहरांपासून या सेवेला सुरुवात करण्यात येणार आहे. या शहरांमध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, दिल्ली आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई या 2 शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यापैकी दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या देशाच्या 4 मेगासिटीजमध्ये सर्वात आधी 5G सेवा नागरिकांना वापरता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या काही महिन्यांत देशभरातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केरळमधील RSSचे नेते PFIच्या निशाण्यावर; केंद्र सरकारकडून सुरक्षेत वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -