घरCORONA UPDATECorona : केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिवाला झाला कोरोना

Corona : केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिवाला झाला कोरोना

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील अधिकारी नित्यनेमाने कोरोनासंबंधीत माहिती, तपशील, अहवाल, सूचना देशातील नागरिकांना देत होते. यामध्ये प्रसार माध्यमांच्या समोर प्रामुख्याने येणारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांचा कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. यासंबंधी माहिती स्वतः लव अग्रवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सध्या आपलण घरातच क्वॉरंटाईन झालो आहेत. तसेच सरकारने खालून दिलेल्या नियमांचे पालन करत आहे. त्यांनी सर्व मित्र परिवार आणि सहकाऱ्यांना तब्येतीची माहिती देत राहू असे म्हटले आहे. तसेच लवकरच तुम्हाला पाहण्याची इच्छा असल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, आज गृहमंत्री अमित शहा हे कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक माहिती आली असून गेल्या काही दिवसांपासून ते उपचार घेत होते. तसेच माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांनाही कोरोनाची लागण झाली असून ते व्हेंटीलेटरवर असल्याचे समजते. देशभरात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असून अशातच आता आरोग्य मंत्रालयातील कर्मचाऱ्यालाही कोरोना झाल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा –

तिला पाठवायचा अश्लील मेसेज; तिनं केलं असं काही, की आपसूक जाळ्यात अडकला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -