Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या पंजाबी वकीलाची आत्महत्या, मोदींना लिहिले पत्र

शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या पंजाबी वकीलाची आत्महत्या, मोदींना लिहिले पत्र

Related Story

- Advertisement -

शेतकरी आंदोलनाला समर्थन करण्यासाठी आलेल्या एका पंजाबी वकीलाने रविवारी सकाळी हरयाणाच्या बहादुरगढमध्ये विष प्राशन केले. पीजीआय रोहतकमध्ये त्यांच्या मृत्यू झाला. वकील्याच्या जवळ एक सुसाईड नोट आढळली असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये वकीलाने तीन कृषी कायदे शेतकरी विरोधात असल्याचे सांगितले आहे आणि शेतकरी व सर्वसामान्यांची भाकरी काढून घेऊ नये, असे लिहिले आहे.

टीकरी बॉर्डरपासून जवळपास सात किलोमीटर दूर पकोडा चौकजवळ शेतकरी आंदोलनात सामील असलेला वकील अमरजीत सिंह यांनी विष प्राशन केले. त्यांची प्रकृती खालवत असल्यामुळे त्यांना त्वरित बहादुरगढच्या नागरिकांना रुग्णालयात दाखल केले. सीएओ झज्जर डॉ. संजय दहियाने सांगितले की, बहादुरगढच्या नागरिक रुग्णालयात जवळपास नऊ वाजून २२ मिनिटांवर पोहोचले.

- Advertisement -

प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पीजीआय रोहतक रेफर केले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पंजाबच्या फाझील्का जिल्ह्यातील जलालाबाद बार असोसिएशनचे सदस्य वकील अमरजीत सिंह आपल्या साथीदारासोबत आंदोलनकर्त्यांनासोबत नयागांव चौक धरनारत जवळ होते.

जलालाबादचा एक आंदोलनकर्ता शेतकरी जसप्रीत सिंह म्हणाला की, ‘गेल्या २५ दिवसांपासून बहादुरगढच्या पकोडा चौकजवळील शेतकरी आंदोलनात अमरजीत थांबला होता. रविवारी सकाळी एका शेतकऱ्याने फोनवर सांगितले की, अमरजीतने विषारी पदार्थ खाला आहे. अमरजीतला बहादुरगढच्या सिव्हिल रुग्णालयात घेऊन गेले, तिथून गंभीर प्रकृतीत रोहतक स्थित पीजीआयएमएसला हलवण्यात आले. तिथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.’

- Advertisement -

वकील अमरजीत जवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पंतप्रधान मोदींना इंग्रजी भाषेत पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘ते तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलकाच्या समर्थनार्थ आत्महत्या करत आहे.’ टाईप केलेल्या या पत्रात खाली स्वाक्षरीसोबत हिरव्या रंगाच्या शाईच्या पेनाने १८ डिसेंबरची तारीख लिहिली आहे. तसेच पंजाबीमध्ये काही ओळी लिहिल्या असून न्यायपालिकेबाबत निराश व्यक्त केली आहे.


हेही वाचा – दाऊदचा निकटवर्तीय अब्दुल माजिदला अटक, २४ वर्ष होता फरार


 

- Advertisement -