Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश मेटा, ट्विटरनंतर आता 'ही' कंपनी करणार कर्मचारी कपात; शेकडोंच्या नोकऱ्या जाणार

मेटा, ट्विटरनंतर आता ‘ही’ कंपनी करणार कर्मचारी कपात; शेकडोंच्या नोकऱ्या जाणार

Subscribe

जगभरातील आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर सध्या मंदीचे सावट दिसून येत आहे. याचा फटका मात्र लाखो कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतोय. अशात ट्विटर, अॅमेझॉन, मेटानंतर आता जगप्रसिद्ध पेप्सिको या मोठ्या कंपनीनेही कर्मचारी मी करण्याचा विचार सुरु केला आहे. यामुळे पेप्सिकोमधील शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आता जाणार आहेत.

द वॉल स्ट्रिट जर्नलच्या माहितीनुसार, पेप्सिको इंकने आपल्या न्यूयॉर्क हेड ऑफिसच्या स्नॅक आणि बेवरेज युनिट्समधून 100 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. संस्थेला अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे अहवालात नमुद आहे. मात्र पेप्सिकोच्या प्रवक्त्याने अद्याप नोकर कपातीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

कंपनीने सांगितले नोकर कपातीचे कारण

- Advertisement -

जर्नलनुसार, कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये पेप्सिकोने कर्मचाऱ्यांना सांगितले की, कर्मचारी कपातीचा उद्देश संस्थेला अधिक सुलभ करणे हा आहे, जेणेकरून आम्ही अधिक कार्यक्षमतेने काम करु शकू. इतरांच्या माहितीनुसार, शीतपेय व्यवसायातील ही खूप मोठी कपात असेल कारण स्नॅक्स युनिटने आधीच स्वैच्छिक सेवानिवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत कर्मचारी कपात केली आहे.

अमेरिकेच्या बाजारावरही मंदीचा परिणाम

अनिश्चित आर्थिक वातावरण आणि चलन वाढीचे सातत्य यामुळे विविध उद्योगांमधील कंपन्यांमध्ये एक अस्वस्थता आली आहे, यामुळे कंपन्यांनी खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल पब्लिक रेडिओनेही नोकऱ्यांवर मर्यादा घातली आहे तसेच वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी इंकच्या CNN ने नोकऱ्या कमी केल्या आहे, यात इतर अनेक मीडिया दिग्गज कंपन्यांचाही समावेश आहे. दरम्यान Amazon.com Inc., Apple Inc. आणि Meta Platforms Inc. मोठ्या टेक कंपन्यांकडून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे.

- Advertisement -

चिप्स, क्वेकर ओट्स, डोरिटोस आणि कोल्ड ड्रिंक्स सारख्या अनेक गोष्टी पेप्सिको कंपनीकडून उत्पादित केल्या जातात. पेप्सिकोच्या आकडेवारीनुसार, या कंपनीत जगभरात सुमारे 3,09,000 कर्मचारी कार्यरत आहेत. एकट्या अमेरिकेत पेप्सिको कंपनी 1.29 लाख लोकांना रोजगार देते. मात्र आता अमेरिकेतही मंदीचे सावट असल्याने पेप्सिकोसह देशातील सर्व मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत.


शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आंबेडकरांच्या हातून घडलं; उदयराजेंचे प्रतिपादन

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -