घरताज्या घडामोडीLayoffs 2023 : गूगलची पालक कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना काढले

Layoffs 2023 : गूगलची पालक कंपनी अल्फाबेटने 12 हजार कर्मचाऱ्यांना काढले

Subscribe

कर्मचारी कपातीची टांगती तलवार नवीन वर्षातही कायम आहे. कर्मचारी कपातीची टांगती तलवार नवीन वर्षातही कायम आहे. अशातच गूगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

कर्मचारी कपातीची टांगती तलवार नवीन वर्षातही कायम आहे. कर्मचारी कपातीची टांगती तलवार नवीन वर्षातही कायम आहे. अशातच गूगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेट कंपनीने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अल्फाबेट कंपनीने कर्मचारी कपात केल्याची माहिती रॉयटर्सने दिली. (Layoffs 2023 googles alphabet layoffs 12000 employees)

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांना नोकरी गेल्याबाबतची माहिती दिली. जगभरातील 6 टक्के नोकर कपात करण्याचा निर्णय गुगलने घेतला.

- Advertisement -

दरम्यान, “नोकर कपातीचा परिणाम इतर सहकाऱ्यांवरही होतो. ज्यामध्ये भरती आणि काही कॉर्पोरेट कामं, तसेच काही अभियांत्रिकी आणि उत्पादनावरही याचा परिणाम होतो. सध्या जगभरात नोकरी कपात होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम यूएसमधील कर्मचाऱ्यांवर होतो”, असे गुगलने सांगितले.

याशिवाय, “आम्ही घेतलेल्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेत आहोत. कंपनीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी हा महत्वाचा क्षण आहे. एकूण खर्चाचे नियोजन आणि पुढील तयारासाठी हा निर्णय घेतला आहे. नोकरीवरुन काढलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा नोटीस कालावधी असेल अथवा 60 दिवसांचा पगार दिला जाईल”, असे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी काढलेल्या कर्मचाऱ्यांना ईमेलवरुन सांगितले.

- Advertisement -

बेरोजगारीत मोठी वाढ

कोरोना महामारी आणि आर्थिक मंदीमुळे भारतासह जगभरात अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. विशेषत: आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवतोय. यात भारतातही कोरोनानंतर अनेकांच्या हातचं काम गेले. त्यामुळे भारतात अद्यापही अनेक सुशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहे. अशा परिस्थितीत देशातील बेरोजगारीबाबत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात बेरोजगारीने गेल्या 16 महिन्यांतील उच्चांक गाठला. यात 10 राज्यांत तर नोकऱ्यांची वानवा आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये देशात 8 टक्के असलेला बेरोजगारीचा दर डिसेंबर 2022 मध्ये 8.3 टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) आकडेवारीतून समोर आली आहे.


हेही वाचा – निवडणूक आयोग शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आम्हाला देईल; शिंदे गटाच्या किरण पावसकरांना विश्वास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -