घरदेश-विदेशकेंद्रीय मंत्री म्हणतात, 'विजय माल्ल्यापासून काहीतरी शिका'!

केंद्रीय मंत्री म्हणतात, ‘विजय माल्ल्यापासून काहीतरी शिका’!

Subscribe

विजय माल्ल्यापासून काहीतरी शिका असा अजब सल्ला केंद्रीय मंत्री ज्युअल ओराम यांनी आदिवासींना दिला आहे. हैद्राबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशी पळालेल्या विजय माल्ल्यांची केंद्रीय मंत्र्यांनी उघडपण स्तुती करत माल्ल्याला ‘स्मार्ट’ म्हटले आहे. विजय माल्ल्यापासून काहीतरी शिका! असा अजब सल्ला केंद्रीय मंत्री ज्युअल ओराम यांनी दिला आहे. आदिवासींसाठी आयोजित हैद्राबादमधील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हा अजब सल्ला दिला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या या विधानावरून आता वाद निर्माण झाला असून मंत्र्यांना नक्की म्हणायचे तरी काय आहे? असा सवाल आता विचारला जात आहे. तसेच तुम्ही बँकांकडू कर्ज घ्या आणि उद्योजक व्हा असे देखील ज्युअल ओराम यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले ज्युअल ओराम

लोक सद्या विजय माल्ल्यावर टीका करत आहेत. पण तुम्हाला माहित आहे? विजय माल्ल्या कोण आहे? विजय माल्या स्मार्ट आहे. त्याने अनेक कामगार घडवले. त्याने देशात सरकार, बँक आणि राजकारण्यांचा पुरेपुर वापर करून घेतला. तुम्हाला विजय माल्ल्या सारखे हुशार होण्यापासून कुणी अडवले आहे? व्यवस्थेपासून काहीतरी शिकायला तुम्हाला कुणी अडवले आहे? बँकेपासून कर्ज घेण्यापासून तुम्हाला कुणी रोखले आहे? असा सवाल देखील ओराम यांनी आदिवासींना केला. मागासवर्गीय आणि आदिवासींना शिक्षण, नोकरी आणि राजकारणात आरक्षण आहे. पण, ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या बाबतीत काहीसा फरक पडतोय. आपल्याला हुशार बनले पाहिजे. आपल्याला उद्योजक बनले पाहिजे. आपल्याला माहिती मिळवली पाहिजे. कारण माहितीच्या जोरावर सत्ता मिळवता येते. ज्याकडे माहिती आहे तो सत्ता मिळवू शकतो. त्यामुळे विजय माल्लापासून काहीतरी शिका असा अजब सल्ला यावेळी ज्युअल ओराम यांनी आदिवासींना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला नोकरी देणाऱ्याच्या भूमिकेत पाहू इच्छितात. तुम्ही किती काळ नोकरी करत राहणार आहात? मी स्वत: देखील आदिवासींसाठी नवीन योजना आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. जेणेकरून तुमच्यामधून नवीन उद्योजक घडू शकतील.

- Advertisement -

बँकांना चुना लावून माल्ल्या पसार

भारतीय बँकांना जवळपास ९ हजार कोटींचा चुना लावून मद्य सम्राट विजय माल्ल्या परदेशात पसार झाला आहे. भारतामध्ये त्याच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. शिवाय, त्याच्या हस्तांतरणासाठी देखील भारतीय सुरक्षा यंत्रणा इंग्लंडशी संपर्कात आहेत. त्यामुळे अशा फरार उद्योजकाचे उदाहरण देऊन केंद्रीय मंत्र्यांना नेमके सांगायचे तरी काय आहे? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -