वाराणसी : अत्याधुनिक जगात आता सगळेच काही हायटेक झाले आहे. एका क्लीकवर सगळ्याच गोष्टी उपलब्ध होत असल्याने जो तो या नवतंत्रज्ज्ञाचा वापर करीत आहे. मात्र, याच तंत्रज्ज्ञानाच्या वापरातून सायबर गुन्हेगारीही वाढीस लागली आहे. दरम्यान वाराणसी पोलिसांनी बनावट वेबसाइटद्वारे पॅन आणि आधार कार्ड बनवून सीम कार्ड मिळवणाऱ्या आणि त्यातून बॅंक खाते उघडणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे. याच टोळीतील एकाजणास आज अटक केल्यानंतर धक्कादाय खुलासे समोर आले आहेत.(Learned from You Tube how to make fake AadhaarPancard Fraudulent gang behind bars)
बनावट वेबसाइटद्वारे पॅन आणि आधार कार्ड बनवून सिम मिळवणाऱ्या आणि त्यातून बँक खाते उघडणाऱ्या टोळीतील आणखी एक सदस्य निरंजनकुमार शहा याला सोमवारी सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, ज्यामध्ये त्याच्या सहभागावरून अटक करण्यात आली होती. त्याच्या विविध खात्यांमध्ये पडलेले 11 लाख 81 हजार 132 रुपये, मोबाइल, आधार कार्ड, डेबीट कार्ड असा 5 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपी बुडिया हा गोला पूर्णिया, बिहारचा रहिवासी आहे.
हेही वाचा : राहुल गांधींनी चालवली तब्बल 264 Km बाईक; पँगॉन्ग त्सो लेकवरून खार्दुंग ला गाठले
14 जणांना यापूर्वीच करण्यात आली होती अटक
वाराणसीच्या सायबर क्राइम स्टेशनचे ठाणेदार विजय नारायण मिश्रा यांनी सांगितले की, निरंजन कुमार शहा यांच्या मोबाइलमध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीत त्याचा सहभाग समोर आल्यानंतर वस्तुस्थितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. या टोळीशी संबंधित 14 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आल्याचे सांगितले.
हेही वाचा : Atal Park : आधी नेहरू आता अटलबिहारी वाजपेयींवर निशाणा, नाव बदलाचं राजकारण पेटलं
चौकशीतून आली धक्कादायक माहिती समोर
चौकशीत निरंजन शहा याने ग्रॅज्युएशन आणि कॉम्प्युटर कोर्स केल्याचे सांगितले. यूट्यूबच्या माध्यमातून माहिती मिळवून सायबर गुन्ह्यांच्या जगात पाऊल ठेवले. 2021 मध्ये सायबर गुन्हे करणाऱ्या अफजल आलमला तो भेटला तेव्हा त्याने शहा याची ओळख पंकज यादवशी करून दिल्याचे त्याने सांगितले. या तिघांनीही वेबसाइट बनवून आधार आणि पॅन कार्ड बनवण्यास सुरुवात केली. तिघेही कमाई आपापसात वाटून घ्यायचे. याच कमाईतून त्यांनी अररिया (बिहार) येथे 10 लाख रुपये गुंतवून दुकान उघडले, जमीन खरेदी केली आणि भावाच्या लग्नात खर्च केला अशी माहिती त्याने पोलिसांनी दिली.