घरताज्या घडामोडीलेबनान स्फोट : धक्कादायक घटनेवर सेलेब्रेटींनी व्यक्त केलं दुख:!

लेबनान स्फोट : धक्कादायक घटनेवर सेलेब्रेटींनी व्यक्त केलं दुख:!

Subscribe

लेबनानची राजाधानी बेरूतमध्ये मंगळवारी दोन भयंकर स्फोट झाले. लेबनानच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात ७० जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटाने पुर्ण शहर हादरून गेले. या स्फोटानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी, भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट,मिताली राजने दुख: व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर लेबनान देशाचे पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून या घटनेवर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

शिल्पा शेट्टीने ट्वीट करत या भयंकर स्फोटावर दुख: व्यक्त केलं आहे. “ही एक अत्यंत दुदैवी घटना आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. तसंच जखमी लोकांनी लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करत आहे.”

- Advertisement -

तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने हृदयद्रावक आणि धक्कादायक अशा दोन शब्दात घटनेचं वर्णन केलं आहे. त्याचबरोबर मृतांना श्रध्दांजली वाहिली आहे.

- Advertisement -

तर भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने या घटनेचं भयावह असं एका शब्दात वर्णने करत मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं.

विराट कोहलीबरोबर किक्रेटपटू दिनेश कार्तिक, कुलदीप यादव यांनी देखील या घटनेवर दुख: व्यक्त केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -