घरताज्या घडामोडीश्रीलंकेच्या आर्थिक संकटादरम्यान 'हा' देश झाला दिवाळखोर; खाण्या-पिण्याची होतेय मारामारी

श्रीलंकेच्या आर्थिक संकटादरम्यान ‘हा’ देश झाला दिवाळखोर; खाण्या-पिण्याची होतेय मारामारी

Subscribe

श्रीलंका सध्या आर्थिक संकटाशी सामना करत आहे. यादरम्यान आणखीन एक देश दिवाळखोर झाल्याचे समोर आले आहे. लेबनानचे उप-पंतप्रधान सादेह अल-शमी यांनी आपला देश दिवाळखोर झाल्याची घोषणा केली आहे. शमी म्हणाले की, ‘देशासोबत देशाची केंद्रीय बँक दिवाळखोर झाली आहे. लेबनानी लीरा चलनात ९० टक्क्यांची घसरण झाली आहे.’ संयुक्त राष्ट्राने म्हटले की, ‘लेबनानची ८२ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या गरीब झाली आहे.’

सौदी अरब चॅनेल अल-अरबियासोबत लेबनानच्या परिस्थितीबाबत बोलताना सादेह अल-शमी म्हणाले की, ‘नुकसान भरपाईसाठी जबाबदार देश, केंद्रीय बँक Banque du Liban, इतर बँका आणि ठेवीदार आहेत. कोणी किती भरपाई द्यावी लागेल, याबाबत काहीच निश्चित झाले नाही.’

- Advertisement -

पुढे लेबनानचे उप-पंतप्रधान म्हणाले की, ‘दुर्देवाने केंद्रीय बँक आणि देश दिवाळखोर झाले आहेच. आम्ही यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहोत. दशकांपासून जी धोरण चालत आली आहेत, त्या धोरणांमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर आम्ही काही केले नाही, तर अधिक जास्त नुकसान होईल. आम्ही या परिस्थितीकडे पाठ फिरवू शकत नाही. आम्ही सर्व लोकांना बँकेतून पैसे काढण्याची व्यवस्था करू शकत नाही. काश आम्ही सामान्य स्थितीमध्ये असतो.’

दरम्यान लेबनान आर्थिक मदतीसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संपर्कात आहे. रोज लेबनान आयएमएफची बातचीत करत आहे आणि या बातचीत सकारात्मक होत आहेत. माहितीनुसार दोन वर्षांहून अधिक काळापासून लेबनान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. लेबनानचे हे संकट आधुनिक युगात जगातील सर्वाधिक गंभीर आर्थिक संकटांपैकी एक आहे. हे संकट ऑक्टोबर २०१९मध्ये सुरू झाले होते. या संकटासाठी सत्ताधारी पक्षातील भ्रष्टाचारी जबाबदार आहेत. लेबनानच्या सरकारने देशातील बिघडत चाललेली आर्थिक स्थिती ठीक होण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – भारत सरकारने २२ यू ट्युब चॅनेल्सवर घातली बंदी, ४ पाकिस्तानी अकाऊंटचा समावेश


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -