घरटेक-वेकElon Musk Twitter News : एलन मस्क ट्विटरचे नवे मालक; युजर्समध्ये निराशा,...

Elon Musk Twitter News : एलन मस्क ट्विटरचे नवे मालक; युजर्समध्ये निराशा, अनेकांनी डिलीट केले अकाऊंट

Subscribe

टेस्ला कंपनीचे मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेताच युजर्सच्या एका वर्गात एकाप्रकारे निराशा, नाराजी दिसून येत आहे. तर एका वर्गाने आता ट्विटरविरोधात आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरु केली आहे. यामुळे आज ट्विटरवर ट्विटरच्याच विरोधात ट्रेंड दिसू लागला आहे. एलन मस्क यांनी सोमवारी सांगितले की, ट्विटरवरील प्रत्येकाला आता त्यांचे कट्टर विरोधकाविरोधात भले तो कोणीही असो व्यक्त होण्याची संधी दिली जाईल. मस्कच्या या विधानावर एका विशिष्ट विचारसरणीने प्रेरित असलेल्या ट्विटर युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे युजर्सनी ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिलीट करण्याबरोबरच #LeavingTwitter हा ट्रेंड सुरु केला आहे. तर दुसरीकडे विरोधी विचारांनी प्रेरित युजर्सनी #FreeSpeech सह मस्क यांच्या विधानाचे समर्थन केलेय.

एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच, डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली. अमेरिकन व्यंगचित्रकार पॅट ब्रॅगले यांनी लिहिले की, इलॉन मस्क ट्विटरला कल्पनांच्या मुक्त बाजारपेठेत बदलणार नाही, परंतु ते उजव्या विचारसणींचा एक विषारी नाले बनवणार आहेत.

- Advertisement -

ग्रॅमी पुरस्कार विजेते गायक ग्रे डेलिझल याने विचारले की, एलन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर किती लोक ट्विटर सोडतील आणि नंतर कुठे जाणार आहोत? तर आणखी एक युजर कॅटी हेरजॉनने म्हटले की, जर एलन मस्कने ट्विटर विकत घेतले तर मी कॅनडाला जाईन.

- Advertisement -

बाकी युजर्सबद्दल बोलताना रोफर नावाच्या युजरने लिहिले की, मला ट्विटरच्या सीईओची पर्वा नाही, पण मी माझे ट्विटर अकाउंट डिलीट करेन. कारण मस्क हा फॅसिस्टवादी अब्जाधीश आहे. मी स्वतःला वचन दिले आहे की, मस्कच्या घाणेरड्या कामात मी अडकणार नाही.

विद्वान डॉ. मॅट वॉल्श म्हणाले की, मी माझे ट्विटर अकाऊंट हटवत आहे. मी बदमाश अब्जाधीश चालवलेले प्लॅटफॉर्म वापरू शकत नाही. त्यामुळे मी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉक यापुरते मर्यादित राहीन. मी माझ्या तत्त्वांवर ठाम आहे.

एलन मस्कने ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर, निराशेनंतर एक वर्ग #LeavingTwitter ट्रेंड करत असेल, परंतु दुसरीकडे दुसरा वर्ग मस्कच्या एन्ट्रीचा आनंद साजरा करत आहे. #LeavingTwitter शी स्पर्धा करण्यासाठी, #FreeSpeech ट्रेंडिंग सुरू झाले. रॉबर्ट नावाच्या युजरने लिहिले की, एलन मस्कचा विजय साजरा करण्यासाठी हा एक उत्तम हॅशटॅग आहे.

#LeavingTwitter हॅशटॅगवर अंकुर नावाच्या युजर्सने लिहिले की, RW एलन मस्कच्या ट्विटर खरेदीचा आनंद साजरा करत आहे. आता ट्विटर पूर्वीप्रमाणे तटस्थ आणि पक्षपाती नसेल अशी अपेक्षा आहे. तो LW #LeavingTwitter ट्रेंड करत आहे कारण त्याला भीती आहे की, आता सत्याचा न्यूट्रल प्लॅटफॉर्मवर प्रचार केला जाईल.

एलन मस्क यांना आधीच भाषण स्वातंत्र्याचे समर्थक मानले जाते. एलन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विट केले होते, ज्यामध्ये त्याची झलक स्पष्टपणे पाहायला मिळत होती. मस्कने ट्विट केले की, मला आशा आहे की, माझे सर्वात मोठे टीकाकार देखील ट्विटरवर राहतील कारण फ्री स्पीच अर्थ असा आहे.


Kamala Harris Covid Positive : दोन बूस्टर डोस घेऊनसुद्धा कमला हॅरिस कोरोना पॉझिटिव्ह

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -