इलॉन मस्कवर ट्विटरकडून कायदेशीर कारवाई, तर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया

इलॉन मस्कना प्रति ट्विटर शेअर $54.20 या दराने विलीनीकरण पूर्ण कारण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी ट्विटरने चान्सरी न्यायालयाला केली आहे.

सुप्रसिद्ध टेस्ला या संपनीचे कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क(Elon Musk) यांनी ट्विटर खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर ट्विटरने(Twitter) इलॉन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. तसेच इलॉन मस्कना प्रति ट्विटर शेअर $54.20 या दराने विलीनीकरण पूर्ण कारण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी ट्विटरने चान्सरी न्यायालयाला केली आहे.

हे ही वाचा – ओबीसी आरक्षण नव्या निवडणुका जाहीर करू नका

ट्विटरने इलॉन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केल्या नंतर इलॉन मस्क यांनी सुद्धा स्वतःची प्रतयिक्रीया दिली आहे. प्रतिक्रिया देत इलॉन मस्क म्हणाले, ”oh the irony lol” असे ट्विट इलॉन मस्क(Elon Musk) यांनी केले आहे. इलॉन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. अंतराळात संशोधन क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणारे इलॉन मस्क हे ट्विटरचे सर्वेसर्वा होतील, अशी चर्चा सुद्धा काही दिवसांपासून सुरु होती. एप्रिल महिन्यात त्यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर एवढी मोठी रक्कम खर्च करून ट्विटर खरेदी करत असल्याचे जाहीर केले होते. ट्विटरच्या संचालक मंडळानेसुद्धा या व्यावहाराला मंजुरी दिली होती.

हे ही वाचा – ब्रिटनमध्ये ५ सप्टेंबरला ठरणार नवे पंतप्रधान, ऋषी सुनकही शर्यतीत

पण, इलॉन मस्क यांनी हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय का घेतला या संदर्भांतही सांगितले, की ट्विटर वरील बनावट खात्यांची पुरेशी महिपती कंपनी देत नाही, त्यामुळे मी हा व्यवहार रद्द करत आहे असे इलॉन मस्क(Elon Musk) यांनी जाहीर केले. महत्वाची गोष्ट म्हणजे मजकूरावरील निर्बंध उठवणे त्याचबरोबर बनावट खाती नष्ट करणे या आणि अश्या अनेक गोष्टी करणार असल्याचे इलॉन मस्क यांनी या आधीच स्पष्ट केले होते.

हे ही वाचा –  गोवा काँग्रेसने आमदारांची बंडखोरी दडपली, पण बंडखोर भाजपच्या संपर्कात असल्याचा सूत्रांचा दावा