घरदेश-विदेशसाक्षात बिबट्या सुनावणीसाठी हजर होतो तेव्हा...!

साक्षात बिबट्या सुनावणीसाठी हजर होतो तेव्हा…!

Subscribe

गुजरातमधल्या एका कोर्टामध्ये सुनावणीदरम्यान एक बिबट्याच कोर्टरूममध्ये दाखल झाल्यामुळे चांगलाच गोंधळ माजला.

गुन्हेगारांना शिक्षा ठोठावणारं कोर्ट अर्थात न्यायालय हे एक महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. या कोर्टात बसून न्यायाधीश न्यायनिवाडा करतात. पण गुजरातमध्ये एका कोर्टात खटल्याची सुनावणी सुरू असतानाच चक्क न्यायाधीश महोदय आणि वकिलांनी भर कोर्टातून धूम ठोकली. गुजरातच्या सुरेंद्रनगरमधल्या चोटिला कोर्टामध्ये शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. न्यायाधीश महोदय आणि वकिलांना पळताना पाहून उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच कोर्टाबाहेर धूम ठोकली. आरडाओरडा सुरू झाला आणि कारण कळलं…कोर्टाच्या त्या खोलीत बिबट्या शिरला होता!

..आणि सगळ्यांनी दरवाजाकडे धाव घेतली!

चोटिला कोर्टामध्ये दुपारच्या सुमारास एका खटल्याची सुनावणी सुरू होती. फिर्यादी आणि आरोपी पक्षाकडून बाजू मांडली जात होती. न्यायाधीश महोदय देखील लक्ष देऊन दोन्ही बाजू ऐकत होते. आणि अचानक कोर्टरूमच्या बाहेरून गडबड ऐकू आली. काही कळायच्या आत कोर्टरूममध्ये बिबट्या हजर झाला. ज्या कोर्टात येण्यासाठी आरोपींची घाबरगुंडी उडते, त्या कोर्टाचीच आज घाबरगुंडी उडाली. कारण आज कोर्टात बिबट्याची हजेरी होती! समोर बिबट्याला पाहून कोर्टात हजर असलेल्या प्रत्येकानं दुसऱ्या कशाचाही विचार न करता थेट दरवाज्याकडे धाव घेतली.

- Advertisement -

बिबट्या कोर्टात, न्यायाधीश बाहेर!

कोर्टातल्या न्यायाधीशांपासून पक्षकार, वकील आणि उपस्थित असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी कोर्टरूमबाहेर पळ काढला. पण हे बिबट्या महाशय मात्र तिथेच बसून होते. सर्वांनी बाहेर पडल्यानंतर अखेर बाहेरून कुलूप लावून बिबट्याला आतमध्ये कोंडून टाकलं. सगळ्यांनीच त्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून या बिबट्याला पकडण्यात आलं.


हेही वाचा – बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद

मंत्रालयातही घुसला होता बिबट्या

चोटिला कोर्टाच्या आसपासच्या परिसरामध्ये जंगल भाग असल्यामुळे तिथून अनेकदा बिबट्या आणि इतर वन्यजीव आल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यात देखील गुजरातच्या मंत्रालयामध्ये बिबट्या घुसल्यामुळे खळबळ माजली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -