घरदेश-विदेशअहमदाबादमध्ये समलिंगी महिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

अहमदाबादमध्ये समलिंगी महिलांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं कारण

Subscribe

गुजरातमधील दोन समलिंगी महिलांनी साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने त्यांच्यातील एकीच्या तीन वर्षांच्या मुलीलाही साबरमती नदीत फेकून दिले. सोमवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आशा ठाकोर (वय ३०) व भावना ठाकोर (वय २८) यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. आशाची मुलगी मेघाला नदीतून बाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता. पण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचं कारण या जोडप्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ‘हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करत आहोत’, असं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

पेपर डिशवर लिपस्टिकने लिहिली सुसाईड नोट

एका पेपर डिशवर लाल लिपस्टिकने या दोघींनी आत्महत्येचं कारण लिहिलं आहे.

हे जग आपल्याला एकत्र राहू देणार नाही. आपण पुन्हा कधी भेटणार? पुढील जन्मातच आपण भेटू शकतो. आम्ही पुढच्या जन्मात नक्की भेटू.

- Advertisement -

आशा ही अहमदाबाद मधील बावला येथिल घनश्याम रेसिडेंन्सीमध्ये राहते. तिचं १० वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. तिला दोन मुली आहेत. तर भावना ही बावलाजवळील राजोदा गावातील रहिवासी आहे. तिला दोन मुलं आहेत. एक १४ आणि दुसरा १३ वर्षांचा आहे. तिच्या लग्नाला १५ वर्ष झाली होती.

सहा वर्ष होत्या रिलेशनशिपमध्ये

सूत्रांच्या माहितीनुसार, आशा व भावना या अहमदाबाद जिल्ह्यातील राजोदा गावातील एका फॅक्टरीमध्ये नोकरी करत होत्या. दोघीही विवाहित असून दोघींची लग्नानंतर ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्या गेल्या पाच ते सहा वर्ष रिलेशनशीपमध्ये होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -