भारतात मंदीची अजिबात शक्यता नाही, निर्मला सीतारामन यांचे लोकसभेत उत्तर

सभागृहात विरोधकांकडून महागाईच्या मुद्द्याऐवजी केवळ राजकीय विषयांवरच चर्चा झाली. त्याऐवजी आर्थिक आकडेवारीवर चर्चा होणे अपेक्षित होते. जवळपास ३० खासदार आजच्या महागाईवर बोलले. यापैकी अनेकांनी यातील राजकीय अँगल उपस्थित केले, असा टोलाही सीतारामन यांनी लगावला.

Budget 2022: 5G mobile services to be rolled out in 2022-23, says Nirmala Sitharaman

नवी दिल्ली – भारताची अर्थव्यवस्था ही बहुतेक देशांपेक्षा चांगली आहे. एवढेच नाही तर जगात अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळेच भारतात आर्थिक मंदी येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ब्लूमबर्गच्या सर्व्हेनुसार भारतात मंदीची शून्य शक्यता आहे, असे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सोमवारी लोकसभेत दिले. महागाईवरील चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. यूपीएच्या काळात नऊ वेळा महागाईचा दर दोन आकड्यांवर पोहचला होता, तर सलग २२ महिने यूपीएच्या काळात महागाईचा दर ९ टक्क्यांवर होता. सभागृहात विरोधकांकडून महागाईच्या मुद्द्याऐवजी केवळ राजकीय विषयांवरच चर्चा झाली. त्याऐवजी आर्थिक आकडेवारीवर चर्चा होणे अपेक्षित होते. जवळपास ३० खासदार आजच्या महागाईवर बोलले. यापैकी अनेकांनी यातील राजकीय अँगल उपस्थित केले, असा टोलाही सीतारामण यांनी लगावला.

हेही वाचा – देशात जुलैमध्ये 1.49 लाख कोटींचे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी संकलन

अर्थमंत्र्यांनी दिलेलं उत्तर निराशाजनक असल्याचं काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी म्हटलं. म्हणूनच काँग्रेसने वॉकआऊट केलं. देशात महागाईच नसल्यासारखं सरकारचं वागणं आहे. लोकांना त्रास होत नसल्यासारखं सरकार वागत आहे.  जर देशाच्या १४० कोटी लोकसंख्येच्या समस्यांवर आम्ही प्रश्न विचारत असताना विरोधकांबाबत तुम्ही असं बोलत असाल तर तुमचं उत्तर आम्ही का ऐकावं?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

हेही वाचा व्यावसायिकांना दिलासा! सिलिंडरच्या दरात आतापर्यंत ३७८ रुपयांनी घट, नवे दर पाहा

आपण कधीच अशा प्रकारच्या महागाईचा सामना केलेला नाही. त्यामुळे या परिस्थितवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जास्ती जास्त लोकांना मदत मिळावी, याकरता प्रयत्न केले. मी स्वत: पाहिलं होतं की खासदार आणि राज्य सरकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जर असं झालं नसतं तर भारतसुद्धा त्याच परिस्थितीत ढकलला गेला असता जशी अवस्था इतर काही देशांची झाली आहे. मी याचं श्रेय देशातील जनतेला देईन. इतक्या प्रतिकूल परिस्थितीसुद्धा आज आपण वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येत आहोत”, असं निर्मला सीतारमन यांनी म्हटलं आहे.