घरदेश-विदेशBaramulla Encounter: लष्कर कमांडर सज्जादसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Baramulla Encounter: लष्कर कमांडर सज्जादसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

सुरक्षा दलाने आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची माहिती मिळत आहे.

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात तीन सीआरपीएफ आणि पोलिस कर्मचारी शहीद झाल्याच्या घटनेनंतर काही तासांपूर्वी सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू झाली. सुरक्षा दलाने आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील एकाचे नाव लष्कर कमांडर सज्जाद उर्फ ​​हैदर असे आहे. पोलिस आणि सुरक्षा दलासाठी हे मोठे यश आहे, असे काश्मीरचे आयजी विजय कुमार म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील करीरी भागात सुरक्षा दलावर आणि अतिरेक्यांशी चकमक झाली. आज सकाळी एका दहशतवाद्यांनी एका ब्लाकवर सुरक्षा दलाच्या पथकावर हल्ला केल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) शहीद झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने या भागाला घेराव घालून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

- Advertisement -

दरम्यान, शोध मोहीम अजूनही सुरू आहे. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी सांगितले की हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय आहे. कुमार घटनास्थळी पोहचले व त्यांनी पत्रकारांना सांगितले, “प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार घनदाट बागेतून तीन दहशतवादी आले होते आणि त्यांनी अडथळ्यावरून अंदाधुंद गोळीबार सुरू केला होता. या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान शहीद झाले. हल्ल्यामागे लष्करचा हात असल्याचे दिसत असून आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. ”

तसेच, दहशतवाद्यांनी आपली रणनीती बदलून सुरक्षा दलांवर हल्ला करून पळ काढला, यावर आयजीपी म्हणाले की, ही चिंतेची बाब असून लवकरच सैन्य दल यावर लवकरच योग्य ती पावलं उचलेल, असे सांगितले जात आहे.


संजय राऊत डॉक्टरांची नाही तर सर्वसामान्य जनतेची तात्काळ माफी मागा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -