घर देश-विदेश सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांची जीभ खेचू; केंद्रीय मंत्र्यांनी दिली थेट धमकी

सनातन धर्मावर टीका करणाऱ्यांची जीभ खेचू; केंद्रीय मंत्र्यांनी दिली थेट धमकी

Subscribe

सध्या देशात सनातन धर्मावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. कारण, उदयनिधी यांनी डेंगू, मलेरियाशी सनातनची तुलना केली होती.

नवी दिल्ली : तामिळनांडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. या टीकेनंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यादरम्यानच आता केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी उदयनिधींच्या टीकेला उत्तर देताना थेट धमकीच दिली असून, आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Let the tongues of critics of Sanatan Dharma be pulled Direct threat given by Union Minister)

सध्या देशात सनातन धर्मावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. कारण, उदयनिधी यांनी डेंगू, मलेरियाशी सनातनची तुलना केली होती. या शाब्दिक टीकेचे रुपांतर आता थेट जीभ खेचू आणि डोळे काढू अशा धमकीपर्यंत जाऊन पोहचले आहे. कारण केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी उदयनिधी यांना उत्तर देताना सनातनवर टीका करणाऱ्यांची डोळे काढू आणि जीभ खेचू अशी धमकी देऊन टाकली आहे. यांच्यासोबतच आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भोपाळमधील खासदार प्रज्ञासिंह ठाकुर यांनीही आता या वादात उडी घेतली आहे.

काय म्हणाले होते उदयनिधी?

- Advertisement -

वास्तविक, या संपूर्ण राजकीय गदारोळाची सुरुवात उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून झाली आहे. उदयनिधी काही दिवसांपूर्वीच सनातन निर्मूलन परिषदेत सहभागी झाले होते. तेव्हा बोलताना ते म्हणाले होते की, सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. तर आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. ते पुसून टाकायचे आहे. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.उदयनिधीनंतर त्यांच्या पक्षाचे खासदार ए.राजा त्यांच्या एक पाऊल पुढे गेले. ते म्हणाले, उदयनिधी यांची सनातनबाबतची भूमिका मवाळ होती. ते म्हणाले, सनातन धर्माची तुलना सामाजिक कलंक असलेल्या रोगांशी केली पाहिजे. तर उदयनिधी यांनी सनातनची तुलना मलेरियाशी केली आहे. ए.राजा म्हणाले, सनातनची तुलना एचआयव्ही आणि कुष्ठरोग यांसारख्या सामाजिक कलंक असलेल्या रोगांशी केली पाहिजे असेही ते म्हणाले होते.

हेही वाचा : Afghanistan : पाकिस्तानमध्ये अफगाण शरणार्थींसोबत होतंय गैरवर्तन; 100 जणांना बेकायदेशीररित्या घेतलं ताब्यात

भाजपने पकडले इंडिया आघाडीला कोंडीत

- Advertisement -

उदयनिधी यांच्या वक्तव्यावर भाजप सातत्याने काँग्रेस आणि इंडिया युतीवर निशाणा साधत त्यांना सनातन विरोधी म्हणत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडेच सनातनच्या विरोधकांशी चांगले व्यवहार करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून भाजप नेते सातत्याने भारत आघाडीला कोंडीत पकडत आहेत.

हेही वाचा : लोकशाही मान्य असल्याचे ‘हे’ लक्षण नाही, ठाकरे गटाची भाजपावर टीका

प्रज्ञासिंह ठाकुर यांना काढली औकात

भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यासुद्धा या वादात उतरल्या असून, उदयनिधींच्या टीकेले उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सनातनला संपवण्याची कुणाचीच औकात नाही. सनातन धर्मावर विधाने करणारे द्रमुक नेते उदयनिधी आणि अभिनेते प्रकाश राज हे हीरो नाहीत तर ते खलनायक आहे. जे देशाच्या विरोधात बोलतात.ज्यांना आपण कुठे आणि काय करतोय हेही कळत नाही. असे लोक फक्त खलनायक असू शकतात. मी म्हणते की, ज्याने सनातनला कुष्ठरोग, मलेरिया, डेंग्यू आणि एड्स म्हटले आहे, त्यानेही या रोगांचा आनंद घ्यावा. हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे असेही वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकुर यांनी केले आहे.

- Advertisment -