घरदेश-विदेशकोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी जगन्नाथ पुरी संघटनेकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र

कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी जगन्नाथ पुरी संघटनेकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र

Subscribe

जगन्नाथ पुरूमधील संघटना श्री जगन्नाथ सेनेने राष्ट्रपतींना एक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये 12 व्या शतकातील मंदिरामधील कोहिनूर हिऱ्याला परत भारतात आणण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

ओडिसाच्या एका सामाजिक संघटनेकडून दावा करण्यात आला आहे. त्या संघटनेच्या मते कोहिनूर हीरा भगवान जगन्नाथाचा असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लक्षावं अशी मागणी देखील केली आहे. ज्यामुळे ब्रिटन प्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिराला कोहिनूर परत देईल. दरम्यान, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रिंस चार्ल्स आता राजा झाला आहे आणि नियमानुसार 105 कॅरेटचा हिरा त्यांच्या पत्नीकडे डचेस ऑफ कार्नवाल कॅमिलाकडे जाईल, जी आता नव्या राजाची पत्नी आहे.

द्रौपदी मुर्मूंनी घालावं लक्ष
जगन्नाथ पुरूमधील संघटना श्री जगन्नाथ सेनेने राष्ट्रपतींना एक पत्र पाठवलं आहे. ज्यामध्ये 12 व्या शतकातील मंदिरामधील कोहिनूर हिऱ्याला परत भारतात आणण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. संघटनेच्या मते, कोहिनूर हिरा श्रीजगन्नाथ भगवानांचा आहे आणि तो पुन्हा भारतात आणण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोहिनूर हिरा भारतामध्ये आणण्यासाठी पाहूल उचलण्याचे आश्वासन द्यावे.

- Advertisement -

महाराणा रणजीत सिंह यांनी केला होता दान
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजा रणजीत सिंह यांनी कोहिनूर हिरा आपल्या इच्छेने श्रीजगन्नाथ यांना दान केला होता. त्या काळी महाराजा रणजीत सिंहने अफगानिस्तानचा नादिर शाह विरोधात लढाई जिंकल्यानंतर हा हिरा जगन्नाथ मंदिरात दान केला होता.

इतिहासकारांनी देखील दिला पाठिंबा
इतिहासकार आणि शोधकर्त्यांच्या मते, 1839 मध्ये रणजीत सिंहचा मृत्यू झाला होता आणि 10 वर्षांनंतर इंग्रजांनी कोहिनूरला त्यांचा मुलगा दलीप सिंहकडून हिसकावून घेतला. त्यावेळी त्यांना माहित होत की, तो हिरा जगन्नाथ पुरी मंदिरात दान केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे महात्मा गांधींची एक खास भेट… नरेंद्र मोदींनी सांगितला किस्सा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -