घरताज्या घडामोडीएलजीबीटी समुदायाला समर्थन तर, भारतातील मुस्लिम समाजाला मोहन भागवतांचा सल्ला; म्हणाले...

एलजीबीटी समुदायाला समर्थन तर, भारतातील मुस्लिम समाजाला मोहन भागवतांचा सल्ला; म्हणाले…

Subscribe

एलजीबीटी वर्ग ही समस्या नसून त्यांचा स्वत:चा पंथ आहे, असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एलजीबीटी समुदायाचे समर्थन केले आहे. तसेच, भारतातील मुस्लिम समाजालाही मोहन भागवत यांनी सल्ला दिला आहे.

एलजीबीटी वर्ग ही समस्या नसून त्यांचा स्वत:चा पंथ आहे, असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी एलजीबीटी समुदायाचे समर्थन केले आहे. तसेच, भारतातील मुस्लिम समाजालाही मोहन भागवत यांनी सल्ला दिला आहे. ‘भारतातील मुस्लिमांना घाबरण्यासारखं काहीच नाही. भारतात इस्लाम समाजाला कोणताही धोका नाही. पण तुम्ही श्रेष्ठत्वाची मानसिकता सोडली पाहिजे’, असा सल्ला त्यांनी दिला. (lgbt groups are not the problem rss chief mohan bhagwat supports to lgbt community)

नागपुरातील बाल आणि किशोरवयीन स्वयंसेवकांच्या “नवोन्मेश” या कार्यक्रमात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते. यावेळी त्यांनी पांचजन्यला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “एलजीबीटी समुदायाचं वेगळी ओळख असायलाच हवी. या विचाराला संघाने पाठिंबा दिला पाहिजे. ट्रांसजेंडर समुदाय समस्या नाही. त्यांचा आपला पंथ आहे. त्यांचे देवी देवता आहेत. आता तर त्यांचे महामंडलेश्वर देखील आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आमच्यासमोर कोणी व्यक्ती आदर्श नाही. तर आमचा एकच आदर्श आहे, तो म्हणजे भगवा ध्वज. आणि हेच संघाच्या पूर्वीच्या सर्व सरसंघचालकांनी सांगितल्याचे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे”.

- Advertisement -

पुढे मोहन भागवत म्हणाले की, “ध्वजासारख्या निर्गुण प्रतीकाला आपले आदर्श कसे मानायचे असा प्रश्न संघात येणाऱ्या बालकांसमोर उभा राहायचा. तर त्यासाठी संघात दोन महापुरुषांचे आदर्श पूर्वीपासूनच स्वयंसेवकांसमोर ठेवले जातात. आणि ते दोन महापुरुष म्हणजे रामभक्त हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज. हे दोन महापुरुष संघाच्या स्वयसेवकांसाठी सर्वोच्च आदर्श आहेत”.

याशिवाय, “संघात येणाऱ्या सर्व बाल आणि किशोर स्वंयसेवकानी ते जे काही करतात ते उत्तम केले पाहिजे. हे उत्तम कार्य आपल्या स्वतःच्या अहंकारासाठी नाही, तर आपल्या मातृभूमीसाठी केले पाहिजे. दरम्यान, “नवोन्मेश” या कार्यक्रमात बाल आणि किशोरवयीन स्वयंसेवकांनी शाररिक प्रात्यक्षिके सादर केले. याच पार्श्वभूमीवर बाल स्वयंसेवकांचे असे जास्तीत जास्त प्रदर्शन सर्वांसमोर केल्यास संपर्कात येणाऱ्या प्रत्येक बालकासमोर देश कार्याचे असे भव्य स्वरूप ठेवता येईल. त्यामुळे त्यांना ही प्रेरणा मिळेल आणि आपला देश आज ज्या उंचीवर आहे त्यापेक्षा 100 पट जास्त उंचीवर नेण्याची ताकत या बालकांमध्ये निर्माण होईल” असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – नाशिकमधील शिर्डी- सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -