घरदेश-विदेशचीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचे निकटवर्तीय ली शियांग नवे पंतप्रधान

चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचे निकटवर्तीय ली शियांग नवे पंतप्रधान

Subscribe

नवी दिल्ली : चीनच्या सत्तेत मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यताच आता चीनला नवे पंतप्रधान मिळाले आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ली शियांग हे चीनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. तसेच शुक्रवारी शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपतीपदी वर्णी लागली.

राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या जवळचे सहकारी ली शियांग हे झेजियांगचे गव्हर्नर आणि शांघायचे पक्षप्रमुख आहेत. चीनमध्ये ली शियांग यांची प्रतिमा व्यावसायिक आणि राजकारणी अशी आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये पार पडलेल्या चिनी संसदेच्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या बैठकीत ली शियांग यांचे नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत होते. त्यानंतर आता चीनमध्ये सुरू असलेल्या द्वि-अधिवेशनात पंतप्रधान पदासाठी ली शियांग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

- Advertisement -

शी जिनपिंह पुन्हा सत्तेत आल्याने चीनमध्ये एकपक्षीय राजवट सुरू असल्याचे दिसून येते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) हा चीनचा एकमेव सत्ताधारी पक्ष सलग तिसऱ्यांदा सत्तेत आला आहे. शी जिनपिंग यांची याआधीही दोन वेळा राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती. आता शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत.

दरम्यान शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपती बनल्यानंतर भविष्यातसुद्धा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) या पक्षाची सत्ता चीनमध्ये कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022मध्ये सीपीसी काँग्रेसच्या काळात जिनपिंग यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. जिनपिंग यांना सीपीसी काँग्रेसने आपल्या सर्व प्रमुख धोरणात्मक संस्थांसाठी नवीन नेतृत्व म्हणून निवडले आहे.

- Advertisement -

शी जिनपिंग तिसऱ्यांदा राष्ट्रपती
ली शियांग पंतप्रधान बनल्यानंतर शी जिनपिंग यांनी सलग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी स्विकारली आहे. चीनमध्ये तिसर्‍यांदा सलग सत्तेवर आल्याने शी जिनपिंग यांच्याकडे चीनमधील आघाडीचे नेतृत्त्व या नजरेतून पाहिले जात आहे. माओ त्से तुंग यांच्यानंतर जिनपिंग सलग तिसऱ्यांदा राष्ट्रपती बनले आहेत. जिनपिंग यांच्या आधी माओ त्से तुंग यांनीच सलग तिसर्‍यांदा देशाचे राष्ट्रपती म्हणून देशाचे नेतृत्व केले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -