घरदेश-विदेशLIC मध्ये ८००० पदांची मेगाभरती; असा करा अर्ज

LIC मध्ये ८००० पदांची मेगाभरती; असा करा अर्ज

Subscribe

भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने मागच्या २४ वर्षांतील सर्वात मोठी पदभरती जाहीर केली आहे. देशभरात विविध ठिकाणी एलआयसीमध्ये ‘असिस्टंट क्लर्क’ या पदासाठी ही भरती होणार आहे. भरतीसंदर्भात अधिसूचना निघाली असून अर्जदारांनी १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आपले अर्ज www.licindia.in/careers या वेबसाईटवर ऑनलाईन भरायचे आहेत. सध्या देशात बेरोजगारीचे चित्र दिसत असताना तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती

  • ऑनलाईन नोंदणी १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार
  • पुर्वपरिक्षा – २१ किंवा २२ ऑक्टोबर रोजी होईल.
  • पुर्वपरिक्षेचे पत्र १५ ते २२ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन डाऊनलोड करता येईल.

अर्ज कसा करायचा?

– अर्जदार licindia.in किंवा ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज दाखल करु शकतात.

- Advertisement -

– त्यानंतर “Click here for new registration” या ऑप्शनला क्लिक करुन पुढे दिलेल्या सुचनांचे पालन करा

– अर्ज भरण्यासंदर्भात संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा – ibpsonline.ibps.in/licastaug19

- Advertisement -

एलआयसीने दिलेल्या माहितीनुसार नवीन पदे देशभरातील एलआयसीच्या कार्यालयात भरली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -