Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर अर्थजगत LIC मध्ये नोकर भरती; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

LIC मध्ये नोकर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Subscribe

एलआयसीमध्ये (LIC) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. LIC च्या हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी ते सहाय्यक व्यवस्थापक या पदांवर भरती होणार आहे. या पदांवर निवडले जाणाऱ्या उमेदवारांचे वेतनश्रेणी वार्षिक १४ लाखांपर्यंत असेल.

हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) रिक्त जागांसाठी होणाऱ्या नोकरभरतीत कोणतीही परीक्षा नसणार आहे. भरती गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार एमसीए, बीएससी, बीटेक आणि इतर पदवीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी ते व्यवस्थापन पदांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. एकूण २० जागांसाठी ही रिक्त जागा देण्यात आली आहे. यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी आणि असिस्टंट मॅनेजर या पदांचा समावेश आहे. ३० वर्षापर्यंत वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित वर्गातील उमेदवारांना अधिकतर वयोमर्यादेत सूट मिळेल.

पद –

- Advertisement -

मॅनेजमेंट ट्रेनी – ९ पद

असिस्टंट मॅनेजर – ११ पद

- Advertisement -

पदांची एकूण संख्या – २०

असा करा अर्ज

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२० आहे. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया सर्व उमेदवारांसाठी निशुल्क आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिटआधारे थेट भरती केली जाणार आहे.

LICHFL Job Notification पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

- Advertisment -