घरट्रेंडिंगLIC ने सुरू केली Saral Pension योजना; ६ महिन्यांनंतर घेता येणार कर्ज;...

LIC ने सुरू केली Saral Pension योजना; ६ महिन्यांनंतर घेता येणार कर्ज; जाणून घ्या सविस्तर

Subscribe

भारतीय जीवन बीमा नियम (LIC) ने गुरुवारी 1 जुलै रोजी सरल पेन्शन (Saral Pension) योजना सुरु केली आहे. ही एक सिंगल प्रिमियम योजना आहे. याचा अर्थ असा की LIC पॉलिसी घेताना तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहणार. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही Immediate Annuity plan आहे. योजनेत सर्व जीवन विमा कंपन्यांसाठी समान अटी व शर्ती आहेत. एलआयसीच्या या योजनेत पॉलिसीधारकास एकरकमी रकमेच्या देयकावरील दोन उपलब्ध पर्यायांमधून Annuity निवडण्याचा पर्याय आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्लॅनमध्ये पॉलिसी सुरु झाल्याच्या तारखेनंतर 6 महिन्यानंतर पॉलिसी होल्डरला कधीही कर्ज मिळू शकणार आहे.

- Advertisement -

LIC सरल पेन्शन योजना घेण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. पहिला आहे तो लाईफ इन्युटी विथ 100 परसेंट रिटर्न ऑफ परचेस प्राईस. हा पेन्शन सिंगल लाईफसाठी आहे. अर्थात ही पेन्शन कुण्याही एका व्यक्तीशी जोडलेली असेल. तर पेन्शनधारक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहिल. तर दुसरा प्रर्याय हा जॉईंट लाईफसाठी ( Joint Life Last survivor annuity ) दिला दातो. यात पेन्शन पती-पत्नी दोघांशी जोडली गेलेली असते. यात पत्नी किंवा पत्नीपैकी जो कुणी जास्त काळ जिवंत राहतो त्याला पेन्शन मिलत राहते. जेवढी पेन्शन एका वक्तीला तो जिवंत असताना मिळेल, तेवढीच पेन्शनची रक्कम तो व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याच्या जीवनसाथीला मिळणार असल्याची या योजनेत तरतूद आहे.

ही योजना www.licindia.in या वेबसाइटवरून ऑफलाइन किंवा ऑनलाईन खरेदी करता येईल. योजने अंतर्गत minimum Annuity वर्षाकाठी 12,000 रुपये असणार आहे. किमान खरेदी किंमत Annuity मोड, पर्याय निवडलेल्या आणि पॉलिसी घेणार्‍याचे वय यावर अवलंबून असते. जास्तीत जास्त खरेदी किंमतीची मर्यादा नाही. ही योजना 40 वर्षे ते 80 वर्षे वयोगटातील उपलब्ध असणार आहे.


Oil India Recruitment 2021: ‘या’ १२० जागांवर भरती; दरमहा ९० हजारापर्यंत मिळणार पगार

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -