घरअर्थजगतकेवळ १५० रुपयात घ्या LICपॉलिसी; मिळवा १९ लाख रुपये, कधीही काढू शकता...

केवळ १५० रुपयात घ्या LICपॉलिसी; मिळवा १९ लाख रुपये, कधीही काढू शकता पैसे

Subscribe

१५० रुपयाच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला १९ लाख रुपये मिळणार.

देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी म्हणजे भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC). ही विमा कंपनी प्रत्येक वेळी ग्राहकांच्या फायद्याकरता काही खास योजना आणत असते. नुकतीच या कंपनीने एक योजना आणली आहे. या योजनेमध्ये त्यांनी ग्राहकांच्या मुलांचा विचार केला आहे. या योजनेचे नाव देखील तसेच आहे. ‘न्‍यू चि‍ल्‍ड्रन्‍स मनी बॅक प्‍लॅन’. या योजनेमध्ये मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाचा विचार करुन ही योजना तयार करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला पालकांना देखील मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे त्यांना खर्चाची तशी गणित आखावी लागतात. त्याचनुसारच ही पॉलिसी योजना आणली आहे. या योजनेमध्ये १५० रुपये भरुन तुम्हाला १९ लाख रुपये मिळणार आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी तुम्हाला गरज असेल त्यावेळी तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे.

या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे

  • ही पॉलिसी काढण्यासाठी कमीत-कमी वय शून्य असावे.
  • विमा उघडण्यासाठी जास्तीत-जास्त वयोमर्यादा १२ वर्षे असावी.
  • किमान विमा रक्कम १० हजार रुपये
  • विम्याच्या रक्कमेवर कोणतीही मर्यादा नाही
  • या पॉलिसीमध्ये प्रीमियम वेव्हर बेनिफिट रायडर-पर्याय देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

मॅच्युरिटीचा कालावधी

या पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा कालावधी २५ वर्षे आहे.

- Advertisement -

मनी बॅक हप्ता

या योजनेमध्ये मुलगा किंवा मुलगी १८, २० आणि २२ वर्षांचे झाल्यानंतर विमा उतरवलेल्या मूलभूत रक्कमेपैकी २० टक्के रक्कम एलआयसी भरते. उर्वरित ४० टक्के रक्कम २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीधारकास दिली जाते. तसेच सर्व थकबाकी बोनसही देण्यात येतो.

मॅच्युरिटी बेनिफिट

पॉलिसी मॅच्युरिटीच्या वेळी पॉलिसीधारकाला उर्वरित रक्कमेपैकी ४०% बोनस दिला जातो.

- Advertisement -

डेथ बेनिफिट

पॉलिसीच्या मुदतीमध्ये एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाला तर बोनस आणि अतिरिक्त बोनस त्याच्या कुटुंबाला दिला जातो.


हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयापासून हाकेच्या अंतरावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू पण…. – सामना अग्रलेख


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -