घरCORONA UPDATECoronavirus : कोरोना महामारीने भारतीयांचे आयुर्मान दोन वर्षांनी घटले, IIPS चा अहवाल

Coronavirus : कोरोना महामारीने भारतीयांचे आयुर्मान दोन वर्षांनी घटले, IIPS चा अहवाल

Subscribe

कोरोना महामारीमुळे भारतीयांच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक प्रभावांचा एकत्रित परिणाम देशातील नागरिकांच्या आयुर्मानावरही दिसून आला आहे. मुंबईतील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशनच्या (IIPS) संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात, भारतीयांचे आयुर्मान सुमारे दोन वर्षांनी घटल्याचे दिसून आले आहे.

या अभ्यासानुसार, कोरोना महामारीमुळे पुरुष आणि महिला दोघांच्याही आयुर्मानावर परिणाम झाला आहे. IIPS चे प्राध्यापक सूर्यकांत यादव यांनी बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात दावा केला आहे की, २०१९ मध्ये देशात जन्मावेळी पुरुषांचे आयुर्मान ६९.५ वर्षे होते आणि महिलांचे आयुर्मान ७२ वर्षे होते, जे २०२० मध्ये अनुक्रमे ६७.५ आणि ६९.८ वर्षांवर येऊन पोहचले आहे.

- Advertisement -

आयुर्मान म्हणजे एखादं मुलं जन्माला आल्यानंतर तो किती काळ जगणे अपेक्षित आहे यावरून ठरवले जाते. परंतु याचा थेट संबंध खऱ्या वयाशी लावता येत नाही. त्यामुळे याकडे एक प्रकारे सरासरी वय म्हणूनही पाहिले जाऊ शकते.

कोरोनामुळे ३९-६९ वयोगटातील पुरुषांचा मृत्यू

अभ्यासानुसार, कोरोनामुळे आत्तापर्यंत ३९-६९ वयोगटातील पुरुषांच्या आयुष्यावर सर्वाधिक वाईट परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. य़ामुळे २०२० मध्ये कोरोनामुळे ३५ ते ७९ वयोगटातील सर्वाधिक पुरुषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुरुषांच्या आयुर्मानात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे देशात मृत्यूदरावर होणारा परिमाण पाहण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला आहे.

- Advertisement -

साथीच्या रोगामुळे आयुर्मान घटले

आयआयपीएसचे संचालक डॉ.के.एस. जेम्स यांच्या माहितीनुसार, जेव्हा जेव्हा जग किंवा एखादा देश साथीच्या आजारात गुरफटला जातो. तेव्हा तेथील नागरिकांच्या आयुर्मान घट होत जाते. आफ्रिकन देशांमध्येही एचआयव्ही-एड्सनंतर नागरिकांच्या आयुर्मान लक्षणीय घट झाली. मात्र या रोगावर नियंत्रण आल्याने आयुर्मानातही सुधारणा धाली. त्यामुळे आयुर्मानापेक्षा साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला पाहिजे.

देशात सध्या १६ हजारांच्या आसपास कोरोना रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. तर शनिवारी ६६६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे भारतात तरी लसीकरणाच्या वेगामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास मदत होत असल्याचे दिसून येत आहे. यातच भारताने १०० कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला आहे, तर सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -