Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पीएम मोदींनी ७ वर्षात, तर सीएम योगींनी ४ वर्षात नाही घेतली एकही...

पीएम मोदींनी ७ वर्षात, तर सीएम योगींनी ४ वर्षात नाही घेतली एकही सुट्टी; यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांचा दावा

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात वर्षांच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नाही आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेले साडे चार वर्ष एकही सुट्टी न घेता सतत काम करत आहेत. पंतप्रधान आणि देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दलचा हा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केला आहे. ग्रेटर नोएडामध्ये ‘प्रबुद्ध संमेलना’ला संबोधित करताना दिनेश शर्मा यांनी हा दावा केला.

दिनेश शर्मा म्हणाले की, ‘जो स्वतःसाठी नाहीतर समाजासाठी काम करतो, तोच खरा देशभक्त असतो. असा व्यक्ती बदल घडवू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांच्या कार्यकाळात एकही सुट्टी घेतली नाही. त्यांनी संपूर्ण वेळ जनसेवेसाठी दिला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी देखील एकही सुट्टी घेतली नाही. यामुळे देश आणि राज्य विकासाच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

तसेच भाजपचे उपाध्यक्ष म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जात आणि समाजाच्या आधारावर भेदभाव करत नाही. गेल्या साडे चार वर्षात योगी सरकारने ज्या योजना राबवल्या. याचा समाजातील प्रत्येक घटकाला फायदा झाला आहे.

एकीकडे दिनेश शर्मा ग्रेटर नोएडाच्या कार्यक्रमात उपस्थितीत होते. तेव्हा दुसरीकडे भाजपचे उपाध्यक्ष अरविंद कुमार नोएडामध्ये जनसंपर्क कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच दिनेश शर्मा यांनी शिक्षक समूहाच्या अजून एका कार्यक्रमात उपस्थिती लावली. यादरम्यान दिनेश शर्मा असे विधान केले की, ‘भाजप हिंदू आणि मुस्लिम असा भेद करत नाही. या कारणामुळे या सरकारच्या कार्यकाळात एकही ठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगल झाली नाही.’

- Advertisement -

यंदा मार्चमध्ये भाजप खासदारांना संबोधित करताना मोदींनी त्यांच्या सुट्टयांविषयी सांगितले होते. मोदी म्हणाले होते की, ‘गेली २० वर्षे त्यांनी जनसेवा सुरू ठेवली आहे आणि एकही दिवस त्यांनी सुट्टी घेतली नाही आहे.’


हेही वाचा – गुजरात : भूपेंद्र पटेल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात लवकरच मोठा बदल करणार


- Advertisement -