घरताज्या घडामोडीलिंबामुळे कपूरथला तुरुंग अधिक्षकाची गेली नोकरी, नेमके प्रकरण काय ?

लिंबामुळे कपूरथला तुरुंग अधिक्षकाची गेली नोकरी, नेमके प्रकरण काय ?

Subscribe

सध्या देशभरात महागाईने उच्चांक गाठला असून पेट्रोल डिझेलबरोबरच कडधान्ये, भाज्यांच्याही दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिशावर ताण पडतोय. त्यातच आता लिंबाचाही भाव वाढला आहे. पण याच लिंबामुळे कपूरथला जेलमध्ये अधीक्षक असलेल्या अधिकाऱ्याला नोकरी गमवावी लागली आहे. घटना गंमतीशीर असली तरी गंभीर आहे.

कारण या अधिक्षकाच्या आदेशावरच उन्हाळा असल्याने २०० रुपये किलो भावाने अर्धा क्विंटल लिंबांची खरेदी केली गेली. मात्र हे लिंबू कधीच कैद्यापर्यंत पोहचलेच नाहीत. तपास टिमने याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी कैद्यांकडे जेवणाबदद्ल विचारणा केली. त्यावेळी जेवणात रेशनमध्ये इतर सर्व वस्तू मिळतात. पण लिंब नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

- Advertisement -

तपासात लिंबू खरेदीत घोटाळा करण्यात आल्याचे आणि कैद्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचे समोर आले. तसेच जेलच्या नावाने खरेदी करण्यात येत असलेल्या भाज्या व इतर वस्तू या कधीच जेलमध्ये कैंद्यांना देण्यात आल्या नाहीत तर अधीक्षक गुरनाम लाल त्या नावाने सरकारकडून पैसे उकळत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला तातडीने निलंबित करण्यात आले. लिंबू खरेदीत घोटाळा करण्यात आल्याची ही पहीलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -